मांडवा ग्रा.पं. येथे पार पडली ग्रामसभा

28

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.27ऑक्टोबर):-कोरोणाच्या संकट काळामुळे गेल्या दोन वर्षापासून ग्रामसभेला परवानगी नसल्यामुळे अनेक कामांना मंजुरी देत नसल्यामुळे अनेक विकासकामे रखडली होती. सर्व कामांना मंजुरात देण्यासाठी मांडवा येथील ग्रामपंचायत कार्यालय प्रागंणात ग्रामसभा दि.२६ ऑक्टोंबर रोजी सकाळी ९ वाजता कोरोनाचे सर्व नियमाचे पालन करून प्रत्येक व्यक्तीला मास्क, सेनिटायझरचा वापर, सोशल डिस्टींग ,सर्व व्यक्तीचे तापमान ऑक्सिजन लेवल तपासून सर्व नियमांचे पालन करून ग्रामसभा घेण्यात आली.

या ग्रामसभेच्या अध्यक्ष सरपंच अल्का ढोले तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी सहाय्यक एस.पी.जाधव, पो.पा.दत्तराव पुलाते, सचिव एस.टी.तडसे, तंटामुक्ती अध्यक्ष सुधाकर चव्हाण, सोसायटी अध्यक्ष वसंता आडे,हे उपस्थित होते.

या ग्रामसभेत प्रधानमंत्री आवास प्रपत्र ड घरकुल यादीचे वाचन करण्यात आले,ग्रामपंचायत समित्या गठित करणे ,कर वसुली बाबत मार्गदर्शन करण्यात आले, शबरी घरकुल लाभार्थी यादी तयार करणे,म.ग्रा.रोजगार कृती आराखडा तयार करणे,तसेच यावेळी गावातील भेडसावणाऱ्या समस्या ग्राम परिवर्तन समितीच्यावतीने लेखी स्वरूपात देण्यात आल्या.

यावेळी उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच अंगणवाडी शिक्षिका ,ग्रा.पं. कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.