महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय उमरखेड येथे भव्यदिव्य सत्कार सोहळा संपन्न

48

🔹सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा जिल्हा पतसंस्था व जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त उपक्रम

✒️अमोल उत्तम जोगदंडे(विशेष प्रतिनिधी)

उमरखेड(दि.27ऑक्टोबर):- यवतमाळ जिल्हा शालेय कर्मचारी पतसंस्था र. न. १४७ व यवतमाळ जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने सेवानिवृत्त शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा २४ ऑक्टोंबर रविवार रोजी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय येथे पार पडला .

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष विनोद संगीतराव तर प्रमुखअतिथी म्हणून नीरज डफळे अध्यक्ष यवतमाळ जिल्हा शालेय पतसंस्था यवतमाळ व यवतमाळ जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश भूमकाळे, पतसंस्थेचे सचिव गुलाबराव चव्हाण, पतसंस्थेचे माजी अध्यक्ष विजय विसपुते, तसंस्थेचे माजी सचिव नागोराव चौधरी सर, पतसंस्थेचे माजी संचालक विठ्ठल परांडे, पश्‍चिम विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे जिल्हा सचिव किरण देशमुख ,पश्‍चिम विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष अमोल शिंदे ,जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष प्रमोद देशमुख, तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मिलिंद मुनेश्वर ,प्रियदर्शनी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख, बाळासाहेब देवसरकर या मान्यवरांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.

सदर कार्यक्रमात शंकर स्वामी, रामराव गव्हाणे, गोपाळ तासके सर, जगदेवराव पाचकोरे सर, विजयसिंग पडवळे बाबू ,,मुख्याध्यापक गावंडे स्व. दिलीप चव्हाण यांचा सत्कार त्यांचे चिरंजीव निशांत चव्हाण यांनी स्वीकारला.

दिगंबर जामकर बाबू, सुभाषराव देवसरकर ,सुभाष नाईक संभाजी जोगदे ,विमलताई कांबळे, सीताबाई राठोड, सुधाकर खरे, अशोक राऊत सर ,विश्वंभरराव वानखेडे सर, मोहन बोंडे ,प्रदीप पिंपरखेडे सर ,भगवान गायकवाड सर, आत्माराम साखरे सर, रामबोकान नंदकिशोर जांबुतकर, दिलीप कळसकर ,विजय शेवाळकर यांच्या मान्यवरांच्या हस्ते शाल सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .कार्यक्रमाचे सूत्र संचालन पांडुरंग कानकाटे यांनी तर प्रास्ताविक प्रमोद देशमुख यांनी केले. बाळासाहेब देवसरकर यांनी आभार व्यक्त केले.