मुल बुद्ध टेकडी वरील वर्धापन दिन ४ नोव्हेंबर ला साजरा होणार

27

🔸बौद्ध तरुणांचा व समाजांचा प्रमुख पुढाकार

🔹बौद्ध समाज व तरुणांसोबत ऑल इंडिया पँथर सेना

✒️मूल(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुल(दि.27ऑक्टोबर):-बुद्ध टेकडीवर तथागत भगवान गौतम बुद्धांची मुर्ती उत्खनन दरम्यान सापडली होती. त्या बुद्ध मुर्तीची स्थापना करुन तेव्हापासून येथील समाजाने बुद्ध मुर्तीची गेल्या पंधरा सोळा वर्षापासून मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रम घेऊन बुद्ध मुर्ती वर्धापन दिन साजरा करीत आहेत. गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारी असल्याने मात्र कार्यक्रम होऊ शकला नाही. यावर्षी मात्र कोरोना महामारी अल्प असल्याने अनेक धार्मिक उत्सव, यात्रा, दसरा मेळावा, तुळजापूर ची यात्रा लाखो संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. मात्र बौद्धांची स्थळे कैद केली जात आहेत. त्यामुळे येथील समाजात तिव्र संतापाची लाट आहे. त्यामुळे यावर्षी बुद्ध टेकडीवर वर्धापन दिन साजरा व्हावा म्हणून समाज व तरुण पुढे आला या तरुणांसोबत व समाजासोबत ऑल इंडिया पँथर सेना असून यावर्षी वर्धापन दिन साजरा करण्यास कंबर कसली आहे.

त्यामुळे मुल तालुक्यातील सर्व समाजबाधंवांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन मुल येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ता विनोद निमगडे, ऑल इंडिया पँथर सेना जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार, सुजीत गेडाम, आकाश दहिवले, शम्मी डोर्लीकर, पुरषोत्तम साखरे, अनिकेत वाकडे, बाळू दुधे, काजु खोब्रागडे, अजय रंगारी, अजय दहिवले, आशिष गोंगले, धम्मा घडसे, आकाश येसनकर,आदींनी केले आहे.