लॉयन्स क्लब व संतोषभाऊ मुरकुटे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने नेत्र तपासणी शिबिर संपन्न

48

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधि)

गंगाखेड(दि.27ऑक्टोबर):-लॉयन्स क्लब गंगाखेड टाऊन व संतोषभाऊ मुरकुटे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने शहरातील राजेश्वर फंक्शन हॉल येथे दिनांक 27 ऑक्टोबर रोजी नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले.

या वेळी प्रमुख उपस्थीतीत अब्दुल अश्पाक चाचा, दिपक मुरकुटे, बाळासाहेब राखे, तुकाराम तांदळे, लॉ. बालाजी ढाकणे , लॉ. अतुल गंजेवार, संजय सुपेकर, लॉ. गोविंदराज रोडे, मनोज नळदकर, व्यंकट रेवणवार ,जगदीश तोतला, अंगद औटी ,धोंडीराम शेटे, प्रभाकर देशमुख ,लॉ.भगत सुरवसे, संदिप सानप, अमोल दिवान, लिंबाजी घोबाळे, पवनकुमार कांबळे, सय्यद ईरफ़ान, शेख शब्बीरभाई, नामदेवराव शिंदे, भागवत तांदळे, कुनाल मुरकुटे व संतोषभाऊ मुरकुटे मित्र मंडळ व लॉयन्स क्लब गंगाखेड टाऊनचे सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक केशवराव देशमुख तर सुत्रसंचालन गोविंदराज रोडे यांनी केले .या शिबिरात एकूण 213 रुग्णांची तपासणी करण्यात आली व त्या पैकी पात्र 53 रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी नांदेड ला रवाना करण्यात आले.
रुग्ण संख्या जास्त झाली म्हणून लॉयन्स क्लब गगांखेड टाऊन ने स्वत गाडी करून रुग्ण नांदेड ला पाठवले.