वणी महाविद्यालयाचे प्रा.विजय गायकवाड यांना कॉस्ट अॅन्ड वर्कस अकाऊटिंग या विषयात पुणे विद्यापीठाची पीएच.डी.प्राप्त

27

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नाशिक(दि.27ऑक्टोबर):–कर्मवीर रावसाहेब थोरात कला व वाणिज्य महाविद्यालयतील वाणिज्य विभागाचे प्रा. विजय गणपत गायकवाड यांना, डॉ. दत्तात्रय गुजराथी, संचालक अशोका बिझनेस स्कूल, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेअंतर्गत कॉस्ट अॅन्ड वर्कस अकाऊटिंग या विषयात “उत्तर महाराष्ट्रातील साखर उद्योगातील खर्च नियंत्रण आणि खर्च कमी करण्याच्या कॉस्ट अॅन्ड वर्कस अकाऊटिंग मधील पध्दती आणि तंत्राचा अभ्यास” विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्रदान केली आहे.मार्गदर्शकाचे मनोगत व्यक्त करताना डॉ. दत्तात्रय गुजराथी म्हणाले की सहकार क्षेत्रातील साखर उद्योग हा सद्यस्थितीत वाढत्या उत्पादन खर्चा मुळे बंद होण्याच्या मार्गावर आहे.

साखर उद्योगातील खर्च नियंत्रण आणि खर्च कमी करण्याच्या पध्दती आणि तंत्राचे संशोधन झाल्यामुळे इतर साखर उद्योग भविष्यात साखर उत्पादन खर्च नियंत्रण आणि खर्च कमी करण्याच्या पध्दती आणि तंत्राचा अभ्यास करून उत्पादन खर्च नियंत्रण आणि उत्पादन खर्च कमी करु शकतील.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संभाजी पाटील म्हणाले की मराठा विद्या प्रसारक समाज ही संस्था अग्रगण्य आहे. नाशिक जिल्हातून २००४ नंतर प्रथमच कॉस्ट अॅन्ड वर्कस अकाऊटिंग या विषयात प्रा. विजय गायकवाड यांना पीएच.डी.प्राप्त झाली आहे त्यामुळे त्यांनी केलेले संशोधन नाशिक जिल्हातील अनेक संशोधकाना संशोधन करण्यासाठी तसेच अनेक व्यवसायकाना व्यवसाय यशस्वी करण्यासाठी उत्पादन खर्च नियंत्रण व कमी करणे करण्यासाठी महत्वाचे ठरेल.

प्रा. विजय गायकवाड हे मराठा विद्या प्रसारक समाजचे वणी येथील कर्मवीर रावसाहेब थोरात कला व वाणिज्य महाविद्यालयतील वाणिज्य विभागात कॉस्ट अॅन्ड वर्कस अकाऊटिंग या विषयात अनेक वर्षापासून अध्यापनाचे काम करत आहे. त्यांना मिळालेल्या यशप्राप्तीबद्दल मराठा विद्या प्रसारक समाजाचे अध्यक्ष डॉ तुषार शेवाळे, उपाध्यक्ष श्री माणिकराव बोरस्ते सरचिटणीस नीलिमाताई पवार, चिटणीस श्री सुनील ढिकले, सभापती श्री राधो आहेर, दिंडोरी संचालक श्री दत्तात्रय पाटील, महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर सेवकवृंद यांनी प्रा.विजय गायकवाड यांचे अभिनंदन केले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संभाजी पाटील, मार्गदर्शक डॉ. दत्तात्रय गुजराथी, प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे, उपप्राचार्य डॉ. यशवंत साळुंके, डॉ. सुरजकुमार प्रसाद, डॉ. दीपक वाळके, सचिन लोखंडे, अजित मेधने, गौरव सोमवंशी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.