✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.27ऑक्टोबर):-त्रिरकुट सरकार हे मराठा समाजाच्या मुळावर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी व बलिदान दिलेल्या कुटुंबियाच्या न्याय हक्कासाठी गांधीगिरी पद्धतीने सुरू असलेल्या आंदोलनास अनेक प्रतिबंधात्मक कारवाई करून दंडील शाही हुकुमशाही स्टाइल ने आंदोलन दाबण्याचे प्रयत्न करीत आहेत असे मत भाजपा प्रदेश उपाध्यक्ष रमेश भाऊ पोकळे यांनी व्यक्त केले.

मराठा समाज या चळवळीतील खमक्या कणखर नेतृत्व आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश भाऊ पोकळे यांची मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाकरता करीत असलेल्या आंदोलन दरम्यान त्यांच्यावर लादण्यात आलेली बंधने आणि झालेला अन्याय या विषयावर सविस्तर चर्चा करून जरांगे पाटील यांच्या समवेत असून अन्यायकारक झालेल्या घटना बद्दल सरकार विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.

आणि संघर्षासाठी पुढे सतत खंबीरपणे तुमच्याशी सहमत व लढाईत सक्रिय सहभाग नोंदवून आम्ही मराठा समाजाकरता तुम्ही केलेल्या संघर्षाच्या लढाईत सोबत असू आणि तात्काळ पुढील आपण जी दिशा ठरवू, त्या दिशेने आंदोलन तीव्र करू यासह विविध विषयावर चर्चा झाली समवेत अनेक पदाधिकारी व विविध क्षेत्रातील सर्व युवक बांधव उपस्थित होते

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED