धरणगाव येथे मुख्याध्यापकांची तंबाखूमुक्त कार्यशाळा संपन्न

28

🔹लवकरात लवकर आपला जळगांव जिल्हा तंबाखुमुक्त करूया – अशोक बिऱ्हाडे

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी. डी.पाटील सर)

धरणगांव(दि.27ऑक्टोबर):- बुधवार रोजी पी.आर. हायस्कूल धरणगाव येथे जि.प. जळगाव आयोजित धरणगाव बीट स्तरीय मुख्याध्यापकांची तंबाखूमुक्त कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न झाली.

या कार्यशाळेचे प्रास्ताविक तंबाखूमुक्त कार्यशाळेचे तालुका समन्वयक संजय गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प. स. धरणगांवचे गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे साहेब, जिल्हा ब्रँड अँबेसेडर राजमोहम्मद शिकलकर, प.रा. विद्यालयाचे मुख्या.डॉ. संजीवकुमार सोनवणे उपस्थित होते.

सर्वप्रथम सर्व सन्माननीय मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर जिल्हा ब्रँड अँबेसिडर राजमोहम्मद शिकलकर यांनी तंबाखू मुक्त कार्यशाळेचे ९ निकष उपस्थित मुख्याध्यापक, शिक्षक बंधू – भगिनी यांना विस्तृतपणे समजावून सांगितले. मी २०१२ पासून तंबाखूमुक्त कार्यशाळा अभियानाला सुरुवात केली आहे. मी सुद्धा व्यसनाधीन होतो पण थोडक्यात बचावलो म्हणून माझे उर्वरित आयुष्य मला समाजासाठी द्यावयाचे आहे. श्री.शिकलकर यांनी सर्व शिक्षकांना विनम्र आवाहन वजा विनंती केली की, आपण आणि आपला जिल्हा व जिल्ह्यातील सर्व शाळा व्यसनापासून दूर राहूया व तंबाखू मुक्त करूया.

कार्यशाळेचे प्रमुख अतिथी गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे साहेब यांनी उपस्थित शिक्षक बंधू – भगिनींना तंबाखू मुक्त कार्यशाळेबद्दल अनमोल असे मार्गदर्शन केले. धरणगाव तालुका लवकरात लवकर तंबाखूमुक्त करुया असा संकल्प करण्यात आला. यानंतर अशोक बिऱ्हाडे यांच्या हस्ते तालुका समन्वयक संजय गायकवाड यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

या तंबाखूमुक्त कार्यशाळेचे सूत्रसंचालन व आभार तालुका समन्वयक संजय गायकवाड यांनी मानले. व प.रा.विद्यालयाने अतिशय मोठा हॉल, माईक सिस्टीम व सर्व व्यवस्था या कार्यशाळेला उपलब्ध करून दिल्याबद्दल प.रा. विद्यालयाचे मुख्या.डॉ. संजीवकुमार सोनवणे व संपूर्ण स्टाफ चे आभार व्यक्त केले. कार्यशाळा यशस्वीतेसाठी पंचायत समितीच्या सर्व टीमने परीश्रम घेतले.