✒️चांदू आंबटवाड(नायगाव प्रतिनिधी)मो:-9307896949

नायगाव(दि.28ऑक्टोबर):- नायगाव तालुक्यातील मौजे कुंटूर येथे दुसर्या मेंढपाळ हक्क परीषदेचे आयोजन दि.30/10/2021 शनिवारी रोजी सकाळी 10:30 वा.खंडोबा मंदिर कुंटूर येथे कुंटूर, बरबडा,कृष्णूर,सोमठाना आदी गावातील मेंढपाळ बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे.

कुंटूर येथे होणाऱ्या दुसर्या मेंढपाळ हक्क परिषदेला अर्जुन बबन थोरात मेंढपाळ आर्मी राष्ट्रीय सांसद प्रमुख तासगाव, वैजनाथ पावडे धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष यांचे मार्गदर्शन लाभणार आहे तर राहुल हजारे मेंढपाळ आर्मी संघटक ,अंकुश मुंढे मेंढपाळ आर्मी कार्याध्यक्ष, चंद्रकांत हुलगे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ,बालाजी पा.नारे,साहेबराव चट्टे, ज्ञानेश्वर भाऊ जोशी यांची प्रमुख उपस्थितीमध्ये मेंढपाळ हक्क परिषद संपन्न होणार आहे तरि या मेंढपाळ परिषदेस मोठ्या संख्येने मेंढपाळांनी उपस्थित राहवे आसे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED