यलमरवाडी येथील महिलेचा खून करणाऱ्या आरोपीवर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी:गणेश भोसले

38

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.28ऑक्टोबर):-यलमरवाडी, ता.खटाव,जि. सातारा येथील 70 वर्षे बौद्ध समाजातील निराधार महिला हिराबाई दगडू जगताप यांचा दिनांक 12- 9-2021 रोजी रविवारी रात्री 9.30 वाजता च्या सुमारास मृतदेह सापडला. या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या आरोपी वर ॲट्रॉसिटी ॲक्टखाली गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रिपाई खटाव तालुका कार्याध्यक्ष गणेश भोसले यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग,कॅम्प वडूज यांना निवेदन देऊन केली.

या खून प्रकरणाची सखोल चौकशी करावी. पीडित महिलेच्या डोक्याला मोठ्या प्रमाणात जखमा दिसून येत आहेत. अशा प्रकारे निर्दयी खून करणाऱ्या आरोपीला व सहकाऱ्यांना चौकशी करून कठोर कारवाई करावी. पिडीत कुटुंबाला न्याय द्यावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल. हे निवेदन देताना रिपाईचे (आठवले) गटाचे ता.कार्याध्यक्ष मा.गणेश भोसले, जिल्हा नेते अजित नलावडे, नेते दत्ता शिंदे,ता.नेते अजिंक्य वाघमारे, ग्रा‌.स.सचिन उमापे, शरद नलावडे, सुनिल चव्हाण, प्रशांत गुजर, राम जाधव, गणेश मोरे, इ. उपस्थित होते.