वरुड येथे आ. देवेंद्र भुयार यांच्याहस्ते ३५ लक्ष रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन !

29

✒️वरुड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

वरुड(दि.28ऑक्टोबर):-शहरातील प्रभाग क्रं १ मध्ये गजानन धावडे ते चंदन उईके यांचे घरापर्यंत रस्ता बांधकाम करण्याकरिता नगरपरिषद वरुड येथे अण्णा भाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत २७ लक्ष ९१ हजार २११ रुपये निधीची तरतुद करुन देण्यात आली आहे. तसेच प्रभाग क्रं १ मध्ये उपासे ते दुपारे यांच्या घरापर्यंत काँक्रिट रोडचे बांधकाम करण्याकरिता नगरपरिषद वरुड येथील दलित वस्ती सुधारना योजने अंतर्गत ७ लक्ष ५१ हजार ४०८ रुपये निधीची तरतुद करुन देण्यात आली आहे. या दोन्ही विकास कामांकरिता ३५ लक्ष ४२ हजार ६१९ रुपयांच्या निधीची तरतूद करून सदर कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते संपन्न झाला .

शहरातील विविध पायाभूत सुविधांच्या उभारणीतून विकासाला गती देण्यासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी केले.

यावेळी भूमिपूजन सोहळ्याला आमदार देवेंद्र भुयार, नगरसेवक महेंद्र देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष बाळु पाटील कोहळे, सैयद गौस अली, स्वप्निल आजनकर, जंग्गु सिग भावे, सुशिल बेले, संकेत यावलकर, जगबीरसिंग भावे, निखिल बनसोड, अमित साबळे, संजय चाक्रपाणी, पुडलिक बासुडे, बंटी धरमठोक, जसमतसिंग भावे, शेख समिर, सतीश सातणकर, अमोल उईके, चेतन सोणेकर, ग्रोविद सिंगभावे, सुरज कासुरडे, कुणाल बेशरे, यांच्यासह आदी मंडळी उपस्थित होती .