बागपिंवळगाव येथे शेतकऱ्यांची आत्महत्या बँकेचे व खाजगी सावकाराचे होते कर्ज

25

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.28ऑक्टोबर):-तालुक्यातील बागपिंपळगाव येथे आज गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास येथील रमेश नामदेव पिंगळे वय वर्ष 30 यांनी कर्जास कंटाळून आत्महत्या केल्याचे उघड. याबाबत सविस्तर वृत्त असे की बागपिंपळगाव येथील रहिवासी रमेश नामदेव पिंगळे शेती करून आपला उदरनिर्वाह चालवत होते. त्यांच्याकडे बँकेचे व खाजगी सावकाराचे कर्ज होते व सततचा कर्ज मागणीचा तगादा होता.त्यांना एक मुलगा, पत्नी,आई, वडील असा परिवार आहे. लहान मुलगा व पत्नी आपल्या माहेरी गेले होते.

आई नातेवाइकाकडे गावी गेलेली होती व वडील खाजगी जागेवर वाचमन म्हणून ड्युटी करून सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घरी गेले असता घरामध्ये पाहिल्यानंतर रमेश पिंगळे यांनी फाशी घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले यानंतर घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालय येथे पाठविण्यात आला आहे.