✒️नवनाथ आडे(विशेष प्रतिनिधी)

बीड(दि.28ऑक्टोबर):-रयत शेतकरी संघटनेने 2021 सालची अतिवृष्टी मदत शेतकर्यांना तात्काळ मिळावी या साठी अनेक वेळा मागण्या केल्या पण जिल्ह्यातील शेतकरयांना 2021 अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहिर होऊन ही हातात न मिळाल्याने ती दिवाळी आधी मिळावा अन्यथा जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधव सर्व प्रशासकीय कार्यालया समोर भिक मांगो आंदोलन करण्याचे निवेदन रयत शेतकरी संघटनेने विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना दिले आहे . जिल्ह्यात आधिच झालेल्या अतिवृष्टीने परेशान आहे त्यात पिक हातचे गेल्याने भर पडली आहे.

दोन महिने जवळ पास उलटुन ही सरकारने मदत जाहिर करून न मिळाल्याने शेतकरी वर्गात तिव्र संतापाचे वातावरण आहे कमीत कमी या दिवाळी अगोदर तरी मदत खात्यावर पडावी अशी अपेक्षा शेतकरयांना आहे . बेकेंने सरकारी मदत वाटपास उशीर करू नये सतराशे कारभारी व काम चाले हळूवारी असा कारभार न करता शेतकर्याची दिवाळी गोड करावी अन्यथा बैके समोर दिवाळीत जिल्ह्यातील शेतकरी कारभारात वर बोंब मारो आंदोलन करतील असे पत्रकारा शी बोलताना रयत शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुनिल ठोसर यांनी सांगीतले

बीड, महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED