महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष विठ्ठलभाऊ लोखंडकार यांचे जिल्ह्यात जंगी स्वागत

30

✒️खामगाव प्रतिनिधी(मनोज नगरनाईक)

खामगाव(दि.28ऑक्टोबर):-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी मनसेच्या राज्य उपाध्यक्षपदी विठ्ठल लोखंडकार यांची नियुक्ती केली आहे. दरम्यान विठ्ठल लोखंडकार हे राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर पहिल्यांदाच जिल्ह्यात आले. यावेळी शेगाव व खमगावसह जिल्हाभरात विठ्ठल लोखंडकार यांचे जंगी स्वागत करण्यात आले व त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.

सर्वप्रथम राज्य उपाध्यक्ष विठ्ठल लोखंडकार यांनी शेगाव येथे श्री संत गजानन महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लहुजी वस्ताद, व अग्रसेन महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला व शेगाव शहरातील चौका चौकात स्वागत स्विकारले व खामगाव येथे पुढील स्वागत समारंभासाठी रवाना झाले. खामगावात आल्यानंतर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर , अग्रसेन महाराज, लोकमान्य टिळक पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

तदनंतर शेगाव नाका, चांदमारी चौक, विकमसी चौक, टावर चौक, या शिवाय प्रमुख मार्गाने स्वागत समारंभ स्वीकारत खामगाव येथील विश्रामगृहावर पत्रकारांसोबत विठ्ठल लोखंडकार यांनी संवाद साधला. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाध्यक्ष लक्ष्मण जाधव , वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष शिवा लगर, शैलेश गोंधणे,अशोक पाटील,जयशराम सातव,आकाश वानखडे, भागवत उगले, रवी उन्हाळे, विनोद टिकार, अमित देशमुख, आनंद गायगोळ, आकाश पाटील, प्रतिक लोखंडकार,अभीजीत महानकर ,यांच्यासह मनसे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होते