राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा म्हणजे राज्यसेवा आणि लोकसेवा यांची पायामुळेच!:नायब तहसीलदार श्री. सिताकांत शिर्के

29

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9975686100

म्हसवड(दि.28ऑक्टोबर):-दिनांक 27/10/2021 रोजी राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा NSSE ह्या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेचा बक्षीस वितरण समारंभ सौभाग्य मंगल कार्यालय, वडूज येथे पार पडला. सदर कार्यक्रमास निवडणूक नायब तहसीलदार श्री. सिताकांत शिर्के, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. मालोजीराव देशमुख, वैद्यकिय अधिकारी डॉ. संतोष मोरे, प्रतिथयश वैद्यकीय व्यावसायिक डॉ. सचिन साळुंखे, पत्रकार श्री. धनंजय क्षीरसागर, श्री. शेखर जाधव,भारतमाता विद्यालय मायणी चे प्राचार्य श्री. विजयकुमार पिसाळ, दादासाहेब गोडसे कॉलेज च्या प्राध्यापिका श्रीमती गीरे मॅडम, राज्यस्तरीय आदर्श शीक्षिका पुरस्कार प्राप्त रंजना सानप, जिल्हा परिषद शाळा होळीचा गाव चे मुख्याध्यापक श्री. आबासाहेब जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

तालुक्यातील विविध शाळांमधील पुरस्कारप्राप्त विद्यार्थी यांचा रोख रक्कम, ट्रॉफी व प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी मान्यवरांची मनोगते झाली. लहान वयात अश्या स्पर्धात्मक परीक्षेचे आयोजन करून अश्या परीक्षा ह्या एमपीएससी व UPSC ची पायामुळेच असल्याचे प्रतिपादन श्री. शिर्के यांनी केले.

ह्या बरोबरच उपस्थित शिक्षक व शिक्षीका यांचाही ह्यावेळी सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा चा पूर्ण परिवार येथे उपस्थित होता. राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा च्या संयोजिका सौ. भारती पवार व श्री सागर पवार यांचे सुयोग्य नियोजन यामध्ये दिसून आले. यावेळी सौ. भारती पवार यांचा सत्कार श्री. शिर्के यांचे हस्ते करण्यात आला. श्रीमती शीतल शिंदे यांनी प्रास्ताविक केले, श्रीमती मंगरुळे मॅडम यांनी आभार तर अतिशय सुयोग्य शब्द फेक करत श्री. प्रसाद जगदाळे यांनी सूत्र संचलन केले.