संस्कार व समाजसेवेतून फुललेले दीव्य नेतृत्व :आशितोष धर्माधिकारी बरबडेकर

28

सृजनशील कर्मयोग्याची जिथे नजर जाते तिथे त्यांना निर्मितीची आणि सृजनाची अतुल शक्यता आणि संभाव्यता दृष्टीस पडते. त्यांना दगडात सुंदर शिल्प दिसते, पदन्यासात नृत्याची चाहूल दिसते. सुरात सुरेल सप्तस्वर दिसतात. रंग आणि रेषेत अनुपम चित्राकृतीची अनुभूती दिसते. कोसळणाऱ्या श्रावण सरीत जीवनाचे अश्राप काव्य दिसते. वसंतात रंग ,रूप , गंध आणि रसाचे आनंद सुक्त दृष्टीस दिसते.समता, बंधुता आणि सहिष्णुतेची ते शीतल सावली असतात. दुःख ही त्याची चिवट प्रेरणा असते.ते सदैव आशावादी असतात कधी क्षणकाल आलीच निराशा तर निराशेच्या गडद गर्भातून आशेचा सूर्य प्रस्फुटित होताना दिसतो.असे सदैव उत्साह संचरलेले आशावादी कर्मवीर या धरती वरील कल्पवृक्ष असतात.यांच्या सान्निध्य आणि सहवासाने निष्पर्ण आणि निष्कर्म अचेतनाला पर्णांकुर फुटून वसंत बहार फुलतो.नीरस जीवन एक उत्सव आणि उत्साह बनते .जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात,हा त्यांचा जीवन सिद्धांत असतो.

जे सुंदर विचारांचे आणि संस्काराचे प्रचारक असतात ज्यांना सज्जनांचा सहवास लाभतो असे युवकांचे प्रेरणास्थान असणारे भारतीय संस्कृतीचा प्रचार प्रसार करणारा, हिंदुत्वाचे रक्षण करून ‘नमस्ते सदा वत्सले मातृभूमी’ या विचारधारेवर आधारित असलेल्या भारतीय जनता पक्षाचे नांदेड जिल्ह्याचे युवा नेतृत्व म्हणजेच आशितोष बालाजीराव धर्माधिकारी. शिस्त, संस्कार, निर्व्यसनी ,चारित्र्यसंपन्न निर्मळ मनाचा भाजपा नांदेडचा युवा कार्यकर्ता त्यांचा आज वाढदिवस त्यानिमित्त प्राध्यापक धाराशिव शिराळे यांच्या लेखणीतून साकारलेली, त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर वाढदिवसानिमित्त थोडक्यात प्रकाश टाकणारे हे विचारपुष्प.

नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील गोदावरीच्या काठावर वसलेले बरबडा हे प्राचिन गाव .भगवान शिवशंभू या गावाचे ग्रामदैवत, महाराष्ट्रातील शिखर शिंगणापूर येथे भगवान बळीचे मंदिर आहे त्यानंतर दुसरे केवळ बरबडा येथे त्या शिवप्रभूचे मंदिर बालाजीराव धर्माधिकारी साहेब यांच्या मळ्यात आहे. त्या ग्रामदेवतेच्या आशीर्वादाने ज्यांनी सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात अतुलनीय कार्य केले आणि आजही करत आहेत ,ते श्री बालाजीराव साहेबराव धर्माधिकारी आणि सौभाग्यवती लक्ष्मी बालाजीराव धर्माधिकारी यांच्या पोटी चिरंजीव आशितोष यांचा जन्म झाला. मोठे बंधू ओमकार बहिण सुप्रिया आणि भाऊजी जयसिंगराव हंबर्डे या सर्वांचे अनमोल संस्कार , आशीर्वाद आणि प्रेम आशुतोष यांना लाभले. नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी कार्यकारणी सदस्य माननीय डॉक्टर संतुकराव हंबर्डे , भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य आदरणीय मिलिंदभाऊ देशमुख यांसारख्या वरिष्ठांचे मार्गदर्शन आशितोष यांना नेहमी लाभत असून आशितोष यांच्या निर्मोही, निर्मळ ,चरित्रसंपन्न समाजसेवेची आवड या गोष्टीचा विचार करून या मान्यवर मंडळींनी२०१७ यावर्षी भाजपा युवा मोर्चा नांदेड कार्यकारणी सचिव, सरचिटणीस भाजपा युवा मोर्चा नांदेड, आणि आता भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नांदेड जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी अशितोष यांना दिली, जी आज समर्थपणे ते पेलत आहेत.

“जेथे वाटा तेथे काटा उगा भेदरून जाऊ नको.
मातीसह मातेचे देणे, फेडायला चुकू नको..

या सुप्रसिद्ध काव्यपंक्तीप्रमाणे आशितोष यांची वाटचाल दैदीप्यमान आहे. समाजकारणाबरोबरच आपली आर्थिक स्थिती मजबूत व्हावी याकरता बंधू ओंकार आणि ते स्वतः “शिवालय बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स” त्याबरोबरच “शिवालय फुटवेअर” ही प्रतिष्ठाने आनंदाने चालवितात .त्यातून प्राप्त झालेल्या अर्थार्जनावर अनेक सामाजिक, शैक्षणिक ,सांस्कृतिक क्षेत्रांत अनमोल योगदान देतात.चिरंजीव मयंक आणि अभिनंदन या लाडक्या भाच्यांचा लाडका मामा आज नांदेड शहराचा सन्मान होतो आहे. त्यांच्या सुंदर कार्यातून एकविसाव्या शतकाची युवा पिढी सक्रिय होत आहे. माता -पिता आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन वागण्या-बोलण्यात नम्रता त्यांचं भावी नेतृत्व फुलवत आहे. परोपकारी वृक्ष याप्रमाणे ते सर्वांसाठी सक्रिय असतात. समाज सेवा हीच ईश्वर सेवा मानून कार्य करणाऱ्या या युवा नेतृत्वाचा भावीकाळ उज्वल आणि सुवर्णमय असेल.

“लक्ष शुभेच्छा तुम्हास आमच्या
पायघड्यासम ‌ अंथरल्या.
धरती संगे अंबर डोले
स्वप्न कळ्याही मोहरल्या.

आदरणीय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आदरणीय डॉक्टर संतुकराव हंबर्डे ,आदरणीय मिलिंदभाऊ देशमुख यांच्यासह सर्व वरिष्ठांच्या आशीर्वादाने, मंगल प्रेरणेने अशितोष यांचे नेतृत्व फुलत आहे. उद्याचा खूप मोठा नेता त्यांच्यात आम्हाला दिसतो आहे. मित्रांचा अंतर्बाह्य निर्मळ मित्र ,समाजसेवेची प्रचंड ओढ असणारा नम्र ,सदाचारी, शिस्तप्रिय अशा या युवा नेतृत्वास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!
नवचैतन्य यावे जीवनात तुमच्या
वसंतासम व्यक्तिमत्व फुलावे
आयुष्याच्या प्रत्येक क्षणात
सुखाचे मंगल दिन यावे.

✒️शब्दांकन:-प्रा. धाराशिव वैजनाथराव शिराळे(साहित्यिक व वक्ते)मो:-9823282059