🔹लॉयन्स, साईसेवा आणि सवंगडी कट्टा समुहाचा ऊपक्रम 

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.28ऑक्टोबर):-लॉयन्स क्लब जनाई, साई सेवा प्रतिष्ठाण आणि सवंगडी कट्टा समुहाच्या संयुक्त विद्यमाने गंगाखेडला नेत्र तपासणीसह सर्व रोग निदान शिबीर घेण्यात आले. या शिबीराच्या माध्यमातून दोन हजारावर रूग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधीचे वाटप करण्यात आले. तर, मोतीबिंदू असलेल्या २० रूग्णांना शस्त्रक्रियेसाठी नांदेड येथे पाठवण्यात आले.

गंगाखेड येथील शनी मंदीर जवळ असलेल्या आदर्श गजानन प्राथमिक विद्यालयात हे शिबीर घेण्यात आले. वैद्यकीय अधिक्षक डॉ. हेमंत मुंडे यांच्या हस्ते ऊद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते बाळकाका चौधरी हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून न. प. सदस्य नितीन चौधरी, शिवसेना जिल्हा ऊपप्रमुख विष्णू मुरकुटे, लॉ. प्रा. डॉ. मुंजाजी चोरघडे, गंगाखेड सोसायटीचे चेअरमन पंडीत चौधरी, व्हाईस चेअरमन ऊमाकांत कोल्हे, सल्लागार अभियंता नागेश पैठणकर, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष बालासाहेब यादव, माजी अध्यक्ष लॉ. सुहास देशमाने, माधव आयाचीत यांची ऊपस्थिती होती. लॉयन्स क्लबचे अध्यक्ष सुशांत चौधरी यांनी कार्यक्रमाचे प्रास्तावीक केले, सुत्रसंचालन साईसेवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष गोविंद यादव यांनी तर सवंगडी कट्टा चे संयोजक रमेश औसेकर यांनी आभार मानले.

युवा नेते साहेबराव चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिबीराच्या यशस्वीतेसाठी विशेष परीश्रम घेतले. नांदेड येथील लॉयन्स नेत्रालयाचे डॉ राजकुमार फड व त्यांच्या सहकाऱ्यांनी नेत्र तपासण्या केल्या. त्यांना गंगाखेड येथील नेत्र रोग तज्ञ डॉ. सुशिल भोसले यांनी सहकार्य केले. डॉ. समिर गळाकाटू, डॉ. मन्मथ महाजन, डॉ. सचीन जोशी यांनी रूग्ण तपासण्या केल्या. जुन्या गंगाखेड शहरातल्या सर्व भागातील नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेतला. मुकुंद मेडीकलच्या वतीने रूग्णांना मोफत औषधी पुरवठा करण्यात आला. साबेर शेख, रणजीत शिंदे, शफी चाऊस, प्रसाद चौरे, गणेश चौधरी, सय्यद एजाज, नागेश डमरे, अभिजीत चौधरी, राम वाणी, धनंजय औटी, सागर गोरे यांचेसह सुशांतभैय्या मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी यशस्वीतेसाठी परीश्रम घेतले.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED