रेड्याची बैलगाडीला धडक; बैलांसह शेतकरी जखमी

30

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.28ऑक्टोबर):-माेकाट रेड्याची बैलगाडीला धडक दिली. यामध्‍ये बैलांसह शेतकरी जखमी झाला. शहरात गेल्या काही महिन्यांपासून एका मोकाट रेड्याने धुडगूस घातला आहे. यापूर्वी अनेक दुचाकीस्‍वारांना धडक देवून गंभीर जखमी केले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. रेड्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे कि, शहरात बुधवारी (दि. २७) जुन्या बस स्थानकाशेजारी शेतकरी बैलगाडी घेऊन घरी निघाला होता. यावेळी समोरुन येणाऱ्या मोकाट रेड्याने बैलांना जोराची धडक दिली. दोन्ही बैलांसह शेतकरीही जखमी झाला आहे.

परिसरातील नागरिकांनी धाव घेत काठ्या आणि दगडांचा मारा करून रेडा पळवून लावला. शहरात मोकाट जनावरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. यात आणखी भर म्हणून रेड्यांचही आगमन झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरन पसरले आहे. रोडवरुन जाणाऱ्या दुचाकी चालकीच्या मागे लागणे, दुचाकीस्‍वारांना धडक देणे या प्रकारांमुळे रेड्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.