✒️नवनाथ पौळ(अंबाजोगाई,विभागीय प्रतिनिधी)मो:-8080942185

बीड(दि.28ऑक्टोबर):- जिल्यातील केज तालुक्यातील दलित चवळीतील एक जेष्ठ कार्यकर्ते गंगाधर सिरसट वय (५७ वर्ष) यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.
या बाबतची माहिती अशी की, दलित चळवळीतील जेष्ठ नेते आणि भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजनचे आघाडीचे जेष्ठ नेते गंगाधर सिरसट वय (५७ वर्ष)हे तात्या म्हणून ओळखले जात होते. त्यांनी दूरसंचार विभागाच्या जिल्हा समितीवर सदस्य पद भूषविले होते. त्यांनी मिलिंद कॉलेज मधून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापिठातून पदवी मिळविली प्राप्त केली होती.

तसेच त्यांनी शिक्षण शास्त्रातील बी एड चे शिक्षण केलेले होते; मात्र त्यांनी नौकरी न करता दलित चळवळीत स्वतःला झोकून दिले होते. कुटुंबाच्या उपजीवेसाठी ते तहसील कार्यालयातील विविध प्रमाणपत्रे काढणे. तसेच उपनिबंधक कार्यालय अंतर्गत चालणारे जमीन व प्लॉटच्या खरेदी-विक्रीच्या नोंदणी व्यावहाराचे देखील काम करीत होते. दरम्यान दि. २८ ऑक्टोबर गुरुवार रोजी गंगाधर सिरसट हे सकाळी घरातून निघून तहसील कार्यालयाकडे जात असताना ते रस्त्यावर येताच त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व मुलगा असा परिवार असून ते चळवळीतील अभ्यासू कार्यरकर्ते होते.ते सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होत असत त्यांचाअँड. बाळासाहेब आंबेडकर यांचेशी ही थेट संपर्क असे तालुक्यातील गावागावात ते दलित समाजात परिचित होते. त्यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असुन घरातील कमवता व्यक्ती व कुटुबांचा आधार गेल्याने त्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे. त्यांच्या निधना बद्दल केजचे तहसीलदार, नायब तहसीलदार व तहसीलचे सर्व कर्मचारी,त्यांचे सहकारी, मित्र परिवार,आपतेष्ट यांच्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध व्यक्तींनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.गंगाधर (तात्या)सिरसट यांच्या पार्थिवावर केज येथील क्रांतीनगर मधील सार्वजनिक स्मशानभूमीत गुरुवारी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची रक्षा सावडण्याचा कार्यक्रम शणिवारी सकाळी ७:३० वा. अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या ठिकाणी करण्यात येणार असुन पुण्यानुमोदन कार्यक्रमही याच दिवशी ठेवण्यात आला आहे. सिरसट परिवाराच्या दु:खात साप्ताहिक पुरोगामी संदेश नेटवर्क सहभागी आहे.

बीड, महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED