🔹हदगाव प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

✒️सिद्धार्थ दिवेकर(तालुका प्रतिनिधी,उमरखेड)मो:-9822995466

हदगाव(दि. 28ऑक्टोबर) तालुक्यातील तळेगांव ग्रामपंचायत कर्मचारी यांचे 14 महिन्यापासून अधिसूचना काढून शासनाने 10 ऑगस्ट 2020 रोजीच्या आधी सूचनेची अंमलबजावणी आत्तापर्यंत केलं नाही.

त्यामुळे तळेगांव ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.तुटपुंज्या पगारावर उदरनिर्वाह कसा करायचा आपल्या कुटुंबाची कशी करावी व आपली दिवाळी कशी साजरी करावी.अशा बर्‍याच अडचणींना त्यांना सामोरे जावे लागत आहे.

परंतु त्यांची ही दयनीय अवस्था प्रशासनाच्या कानापर्यंत का पोहोचत नाही? बरेच वेळा निवेदन देऊन ही त्यांची मागणी कोणी मान्य करत नाही व त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

त्यामुळे त्यांना आत्महत्येशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही..! असा संताप तळेगांव ग्रामपंचायत कर्मचारी कुठे मिळत आहे.

त्यामुळे प्रशासनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता त्यांच्या मागण्या मान्य कराव्या त्यांचा तसेच त्यांच्या राहणीमान भत्ता 2007 पासून लागू असून आत्तापर्यंत त्यांना राहणीमान भत्ता मिळत नाही.

त्यामुळे त्यांचे प्रश्न मार्गी कसे लावता येतील याचा विचार शासन व प्रशासनाने करावा व न्याय द्यावा अशी मागणी ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे तालुका अध्यक्ष टि एस शिंदे व तालुका संघटक गजानन नरवाडे यांनी केली आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED