आमदार लक्ष्मण आण्णा पवार यांच्या आमदार फंडातून जळगाव मजरा येथे दहा लाख रुपयांचा सिमेंट रस्ता नाली बांधकाम सुरू

38

🔸कार्यसम्राट आमदार लक्ष्मण आण्णा पवार यांच्या नेतृत्वाखाली धानोरा जळगाव डिग्रस गावाचा सर्वांगीण विकास करणार : सरपंच सुर्यकांत शिंदे

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.28ऑक्टोबर):- तालुक्यातील धानोरा जळगाव डिग्रस ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत जळगाव मजरा येथे कार्यसम्राट आमदार लक्ष्मण आण्णा पवार यांनी आमदार फंडातून जळगाव मजरा गावासाठी सिमेंट नाली सिमेंट रस्त्यासाठी दहा लक्ष रुपये निधी मंजूर केला होता त्या कामाचे उद्घाटन सरपंच सूर्यकांत शिंदे व ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले

सविस्तर असे की गेवराई तालुक्यातील धानोरा जळगाव डिग्रस ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत जळगाव मजरा येथे गावकऱ्यांच्या व सरपंच सूर्यकांत शिंदे यांच्या विनंतीवरून कार्यसम्राट आमदार लक्ष्मण अण्णा पवार यांनी सिमेंट रस्ता नाली बांधकामासाठी दहा लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला होता त्या कामाची सुरुवात सरपंच सूर्यकांत शिंदे व ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले.

जळगाव मजरा येथे सिमेंट रस्ता नाली कामामुळे गावकऱ्यांना मुख्य रस्ता नाली प्रश्न सुटला असल्याने गावकऱ्यांनी कार्यसम्राट आमदार लक्ष्मण आण्णा पवार यांचे आभार मानले आहेत ,येणाऱ्या काळामध्ये कार्यसम्राट आमदार लक्ष्मण आण्णा पवार यांच्या नेतृत्वाखाली धानोरा ,जळगाव मजरा, डिग्रस या तिन्ही गावांना विविध विकास कामे करणार असल्याची माहिती सरपंच सूर्यकांत शिंदे यांनी दिली आहे यावेळीआणाभाऊ ईदगे, पंडित ईदगे, रामभाऊ, नागटिळक, विकास शिंदे,ग्रा प, सदस्य,विजय घुणे योगेश घुणे,आमोल काबळे, गणेश शिंदे, ओमप्रकाश खुणे,शहादेव पट्टे , महारुद्र खुणे, गणेश मोरे, रुस्तुम ईदगे,मधुसुदन खूणे, प्रमेश्वर ईदगे,मधुकर मोरे,आदी उपस्थित होते