बाळु मामा च्या नावान चांगभल मालीके नंतर आता अमोल धोंगडे स्वामी समर्थ मालिकेतून कलर्स मराठी वाहिनीवर

30

🔹गेवराई चा कलाकार स्वामी समर्थ मालिकेतून महाराष्ट्रभर झळकला

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.28ऑक्टोबर):-कलर्स मराठी या वाहिनीवर सुरू असलेल्या बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेच्या यशानंतर आता स्वामी समर्थ या मालिकेमध्ये बीड जिल्ह्याचा हा युवक कलाकार आपली भूमिका बजावत आहे कलाकारांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असणाऱ्या बीड जिल्ह्यामध्ये अमोल धोंगडे हे गेवराई तालुक्यातील शेकटा या गावचे युवक दहा वर्षाच्या संघर्षामध्ये नाटक मिमिक्री एकांकिका सिरीयल यासह चित्रपटांमध्ये भूमिका बजावणारा हा ग्रामीण अस्सल शेली मधला विनोदी अशा वेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध आणि खळखळून हसवणारा युवा सिनेअभिनेता कलाकार

बीडमधल्या मातीतून जन्मलेला हा मराठमोळा कलाकार अभिनेता आजचा दावेदार उद्याचा सुपरस्टार या ब्रीद वाक्य पासून सुरुवात करणारा आणि आज विविध मालिका नाटक यामधून आपलं महाराष्ट्रभर नाव आणि ओळख तयार केलेली आहे अमोल धोंगडे या कलाकारांनी बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेमध्ये गाणा या पात्रात अभिनय उत्कृष्ट पद्धतीने साकारल्यानंतर आता नव्याने स्वामी समर्थ या मालिकेमध्ये पदार्पण करत आपली कला सादर करत आहे अमोल धोंगडे मुळातच लहानपणापासून एक कलावंत आणि गुणी कलावंत आहे.

शाळा महाविद्यालय कॉलेज यामध्ये प्रत्येक कार्यक्रमांमध्ये आपली कला सादर करून एक वेगळी छाप तयार करणारा युवक गल्ली ते दिल्ली , मुंबई प्रवास पूर्ण महाराष्ट्रभर या कलावंतानी केला आहे सिने अभिनेते लेखक दिग्दर्शन आणि कला या भूमिका त्यांनी साकारल्या आहेत अमोल धोंगडे यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा अशीच त्यांची वाटचाल वेगाने प्रगतीच्या दिशेने जावो आणि सबंध महाराष्ट्रभर त्यांनी आपल्या अभिनयातून आपलं नाव उज्वल करावं हीच सदिच्छा