🔺 बसस्थानक परिसरात गँग रेप

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नाशिक(दि.29ऑक्टोबर):- दिंडोरी तालुक्यातील वणी बसस्थानक परिसरात एका महीलेवर बुधवारी रात्री उशिरा नराधामांच्या टोळीने सामुहीक अत्याचार केल्याने जिल्हाभरात खळबळ उडाली असुन काही संशयीताना चौकशी  कामी पोलीसांनी ताब्यात घेतले असुन पोलीस अधिक्षक सचिन पाटील या तपासासाठी तळ ठोकुनआहेत. वणी बसस्थानक परिसरात बुधवारी रात्री  सदरचा प्रकार घडल्यानंतर घटनेची माहीती पोलीसांना मिळाली.पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांना ही माहीती देण्यात आली. रात्री उपविभागीय पोलीस अधिकारीअमोल गायाकवाड व सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपुत यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पिडीतेला उपचार व वैद्यकीय  तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.सदर घडलेल्या गंभीर घटनेचा तपास सुरु असताना पोलीस  अधिक्षक सचिन पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली व तपासकामी सुचना दिल्या असुन रात्रभर परिसर पिंजुन संशयीतांना पकडण्यासाठी  पोलीस पथक कार्यान्वित  करण्यात आले होते. चार संशयीत यांना याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले असुन पिडीतेला नाशिकला हलविण्यात आले आहे. तर संशयीतची चौकशी  सुरु आहे. वणी परिसरातील संशयीत असुन सामुहीक अत्याचार प्रकरणामधे अजुन संशयीत आहे किंवा कसे ? याचा शोध पोलीस घेत आहेत.

दरम्यान बसस्थानक परिसर हा असामाजीक अपप्रवृत्तीचा अड्डा बनला असुन कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणारे घटक सक्रीय झाल्याने पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी अशा अपप्रवृत्तीचा बिमोड करावा अशी मागणी होते आहे. अटक झालेल्या आरोपीचे नावे खालीलप्रमाणे
  संदिप अशोक पिठे ,राजेन्द्र दिपक गांगोडे आकाश शंकर सिंग सोमनाथ कैलास गायकवाड  या आरोपीवर जबरी लुट संगनमताने अत्याचार व अनुसुचित जाती जमाती अन्वय गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे

Breaking News, क्राईम खबर , महाराष्ट्र
©️ALL RIGHT RESERVED