विकासगंगा जनजागृतीची..

26

🔹जनजागरण मेळावा आणि आदिवासी रेला नृत्य स्पर्धा

🔸आरमोरी पोलीस स्टेशन , गडचिरोली जिल्हा पोलीस दलाचे आयोजन अनेकविध शासकीय योजनांवर मिळणार भरीव मार्गदर्शन.

✒️गडचिरोली प्रतिनिधी(चक्रधर मेश्राम)

गडचिरोली(दि.29ऑक्टोबर):- जिल्ह्यातील जिल्हा पोलीस अधीक्षक अंकीत गोयल यांच्या संकल्पनेतून आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली आरमोरी पोलीस स्टेशनच्या वतीने सर्वप्रकारच्या योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळावी, तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी दिनांक २९/१०/२०२१ रोज शुक्रवारला सकाळी १० वाजता आरमोरी येथुन जवळच असलेल्या मौजा जोगीसाखरा येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे .

या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक (भा.पो.से.) मा. अंकीत गोयल यांचे हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी मा. जे. पी. लोंढे राहाणार आहेत. तर प्रमुख अतिथी, मार्गदर्शक म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी मा. प्रणील गिल्डा, उपवनसंरक्षक धर्मवीर साल विठ्ठल, तहसीलदार कल्याण कुमार डहाट , संवर्ग विकास अधिकारी मा. चेतन हिवंज , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद ठिकरे , वनपरिक्षेत्र अधिकारी मा. अविनाश मेश्राम , व्ही. व्ही. धांडे, कृषी अधिकारी जे. व्ही. घरत, मत्स्य विकास अधिकारी वैध., पोलीस पाटील श्रीमती राधा शेडमाके आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. स्वागतोत्सुक प्रभारी सरपंच मा. संदीप ठाकूर राहणार आहेत.

या जनजागरण मेळाव्यात शासनाच्या संजय गांधी, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, आधार कार्ड, आयुष्यमान भारत योजना , पॅन कार्ड, पंतप्रधान किसान सुरक्षा, कृषी, वन, उज्वला, बाल संगोपन, परिवहन महामंडळाचे दुचाकी शिकाऊ परवाना, कुक्कुटपालन, शेळी पालन संकरित गाई व म्हशी. , मत्स्य व्यवसाय, कोरफड लसीकरण , पोलीस प्रशिक्षण मार्गदर्शन शिबीर याबरोबरच अनेकविध शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार आहे.

सकाळी १० वाजता स्वागत समारंभ आणि उपस्थित मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे. दुपारी १२ वाजता आदिवासी रेला नृत्य स्पर्धा सुरू करण्यात येणार आहे. सायंकाळी ५ वाजता समारोपीय कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून जनतेनी योजनांसह मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आरमोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. मनोज काळबांधे , पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी केले आहे.