रसायन शास्त्र विभागातर्फे एक दिवसीय वेबिनार चे आयोजन

21

✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193

अमरावती(दि.29ऑक्टोबर):-प्रविण खोडके मेमोरियल ट्रस्ट द्वारा संचालित विनायक विज्ञान महाविद्यालय नांदगाव खंडेश्वर येथे “केमिस्ट्री इन एव्हरी डे लाईफ” या विषयावर एक दिवसीय वेबिनार चे आयोजन रसायन शास्त्र विभागाद्वारे आभासी पद्धतीने घेण्यात आले .आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण वेगवेगळे रसायन वापरत असतो. सकाळी उठल्यापासून तर झोपे पर्यंत काही न काही रासायनिक क्रिया -प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये होत असतात .

परंतु विद्यार्थ्यांना रसायन शास्त्र हा विषय अतिशय कठीण व निरस वाटतो हा विषय लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या मनातील भीती काढण्यासाठी व रसायन शास्त्र विषयामध्ये आवड निर्माण करण्यासाठी एक दिवसीय वेबिनार चे आयोजन करण्यात आले.
या वेबिनारला प्राचार्य डॉ. अलका अनंत भिसे यांनी अध्य्क्ष स्थान भूषविले .तसेच डॉ. सुचिता खोडके, IQAC समन्वयक व वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख विनायक विज्ञान महाविद्यालय नांदगाव खंडेश्वर यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली तसेच या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून श्री जमीर शेख, सहायक प्राध्यापक रसायन शास्त्र विभाग श्री शिवाजी सायन्स कॉलेज  अकोला हे उपस्थित होते.श्री जमीर शेख यांनी विद्यार्थ्यांना दिवसभरात आपण विविध वस्तूंच्या माध्यमातू कोणकोणते रसायन वापरतो ते समजावून सांगितले. जसे कि मीठ, टाल्कम पावडर, रोज वापरण्यात येणाऱ्या औषधी यांच्या बद्दल माहिती दिली.

तसेच औद्योगिक क्षेत्रात व वेगवेगळ्या प्रकारचे एक्सप्लोसिव्ह यांच्या रासायनिक क्रियेबद्दल माहिती दिली.तद्वतच आपल्या शरीरामध्ये होणाऱ्या रासायनिक अभिक्रियेबद्दल विध्यार्थाना मोलाचे मार्गदर्शन केले. सूर्याच्या मदतीने वनस्पती कश्या प्रकारे अन्न निर्मिती करतात यावर सविस्तर असे विश्लेषण केले.
श्री. निलेश पडोळे यांनी प्रमुख अतिथी चे परिचय करून दिले तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन डॉ. कविता काकडे यांनी केले.

आपल्या अधयक्षीय भाषणामध्ये प्राचार्य डॉ. अलका भिसे मॅडम यांनी सर्वप्रथम रसायन शास्त्र विभागाचे कौतुक केले आणि “केमिस्त्री इन एव्हरीडे लाईफ” हा अतिशय महत्वाचा आणि मोठा विषय आहे असे सुद्धा सांगितले. त्यांनी आपल्या शरियामध्ये होणाऱ्या रासायनिक अभिक्रियेबद्दल भाष्य केले. विद्यार्थ्यांनी शेवटी प्रमुख वक्त्यांना प्रश्न विचारले आणि त्यांनीही सुरेख पद्धतीने त्यांच्या शंकेचे निरसन केले. या एकदिवसीय वेबिनार ला 110 विद्यार्थ्यांनी आपली नावे नोंदविली होती. ७४ विद्यार्थ्यांनी झूम यॅप द्वारा ह्या वेबिनार चा लाभ घेतला. वेबिनार चे यू ट्यूब वर लाईव्ह प्रक्षेपण सुद्धा करण्यात आले होते