गंगाबाई तलमले महाविद्यालयात मिशन युवा स्वास्थ अंतर्गत कोविड लसीकरण शिबिर संपन्न

30

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.29ऑक्टोबर):- राज्यातील वरिष्ठ महाविद्यालये 20 ऑक्टोंबर पासून प्रत्यक्ष सुरू झालेली आहेत. महाविद्यालयात येणारे 18 वर्षावरील विद्यार्थी लसीकरणापासून वंचित राहू नये याकरिता राज्यात ‘ युवा स्वास्थ मिशन’ अंतर्गत लसीकरण मोहीम सुरू आहे. स्थानिक गंगाबाई तलमले महाविद्यालय व तालुका आरोग्य विभाग यांच्यावतीने महाविद्यालयात लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आला. कोविड-19 लसीकरण शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य मंगेश देवढगले यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी विलास व्ही. दूधपचारे, कॉम्पुटर ऑपरेटर उमेश राउत, परिचारिका संध्या दुधपचारे, प्रा. श्रीकांत कडस्कर, प्रा. संतोष पिलारे, प्रा. गणेश दोनाडकर, प्रा. डिंपल तलमले, प्रा. पल्लवी धोंगडे, प्रा. ओमादेवी साहारे आदी प्रामुख्यने उपस्थित होते.या शिबिरात विद्यार्थ्यांनी व परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शिबिराच्या यशस्वीतेकरिता आरोग्य कर्मचारी, प्राध्यापक वृंद व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक यांनी मोलाचे सहकार्य केले.