एक अविस्मरणीय व्यक्तिमत्वाची सेवानिवृत्ती

30

पूर्ण नाव- रघुपति राजोबा अगडे
जन्मतारीख- 10.10.1963
जन्मगाव- गोरेगाव
शिक्षण–डी .एड., बि .ए. बि.एड.
सुरु नोकरी तारीख- 12-02-1985

सुरु नोकरी पहिली शाळा=12-02-1985 ते 30.4.85
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कालीमाटी

दिनांक–01-05-1985ते10-08-1995 जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा दवडीपार

दिनांक 10 ऑगस्ट 1995 ते 13 ऑगस्ट 1997 पर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोरेगाव येथे सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत

14 ऑगस्ट 1997 ते 15 मार्च 2004 या काळात पदवीधर शिक्षक म्हणून जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मोह
गाव बुजुर्ग

केंद्रप्रमुख म्हणून 6 मार्च 2004 ते 30 जून 2008 समूह साधन केंद्र चिखली
1 जुलै 2008 ते 31 ऑक्टोबर 2021 मोहगाव तिल्ली

*प्राप्त पुरस्कार*

जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2002

राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2007

गोंदिया जिल्हा पालकमंत्र्यांचे हस्ते सत्कार 2018

*शैक्षणिक कार्य*

दवडीपार येथे शिष्यवृत्ती तयारी वर्ग
जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मोहगाव बुजुर्ग येथे श्रमदानातून 100मीटर शाळेचा रस्ता तयार करण्यात पुढाकार व वर्ग सातवीचे शिष्यवृत्ती वर्ग तयारी

मोहगाव तिल्ली शाळेला आदर्श शाळा निर्मितीसाठी भरघोस योगदान

ज्ञानरचनावादी वर्ग केंद्रस्तरीय साहित्य संवाद परिषद 50 हजार रुपये खर्च करून आयोजित करण्यात आली होती.
केंद्रातील विविध शाळेत कुंपण, पाण्याची व्यवस्था ,विद्युत् तसेच गुणवत्ता मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात अथक परिश्रम घेतले.

माननीय आर. आर.अगडे सर यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातल्या विविध उपक्रमात केंद्रातील विविध शाळांना प्रकाश झोतात आली.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पलखेडा गोंदिया जिल्ह्यातील पहिली डिजिटल शाळा म्हणून नावारूपास आली.

मोहगाव तिल्ली हे पहिले डिजिटल केंद्र म्हणून गोंदिया जिल्ह्यात नावारूपास आले

पहिली ज्ञानरचनावादी केंद्र म्हणून मोहगाव तिल्ली केंद्राला मान मिळाला

गौरी टोला येथील गोपाल बिसेन सरांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला

*शैक्षणीक उपक्रम*

.ग्रीटिंग कार्ड ,विद्यार्थी शैक्षणिक साहित्य निर्मिती ,,प्रयोगशाळा शिक्षण दीप 2009 ,विविध शाळांना डिजिटल करण्यासाठी स्वतःकडून प्रत्येकी अकरा शाळांना प्रत्येकी हजार रुपये देणगी, विविध शाळा स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाची रुजवात, प्रत्येक शाळेच्या दर्शनी भागावर माहिती फलक, पेंटिंग करून शाळेला एक आकर्षक रूप देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला .गुढीपाडवा प्रवेश वाढवा बॅनर प्रत्येक शाळेला स्वखर्चातून पुरविण्यात आले .स्वच्छ विद्यालय, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची यशस्वीरित्या अंमलबजावणी करण्यात पुढाकार,
स्वच्छतेच्या सवयी बाबत जागरूकता अभियान
दर वर्षी वर्ग पहिलीच्या विद्यार्थ्यांना लेखणी व पाटी आणि लेखन साहित्य मोफत स्वखर्चातून पुरविले.

 

*समाजाप्रती असणारा दायित्व*

दुर्लक्षित असणारा घटक म्हणजे शाळेत स्वयंपाक शिकविणाऱ्या महिला , त्यांना साडीचोळी देऊन
भाऊबीज देणारा एक आदर्श भाऊराया, गावागावात संपर्क असणारा लोकांचा केंद्रप्रमुख, गावातील व्यक्तींसाठी खेळ आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, श्रमदान, संस्कार शिबिरे राबविणारा समाजसेवक, मुलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि ज्ञानोपासक कार्यक्रम घेणारा ज्ञान पिपासू, लेकरांच्या कवितेला आकार देणारा सृजनकार. शैक्षणिक दौरे, प्रवास घडविणारा शिक्षण यात्री ,शिक्षकाना प्रेरणा देणारा शक्तिपुंज अशी ही व्यक्ती आपल्या चिरठायी स्मरणात राहील.

*मार्गदर्शक व प्रेरणादायी कार्य*

एक मोठ्या मनाचा उदार व्यक्तिमत्व म्हणून त्याचा सर्वत्र परिचय आहे. जिल्ह्याचे एक मार्गदर्शक विविध शैक्षणिक प्रयोगात त्यांचा सिंहाचा वाटा असायचा. विद्यार्थ्यांबद्दल आस्था, प्रत्येक शिक्षकांबद्दल असणारी सहकार्य वृत्ती एक कुशल नेतृत्व आणि प्रशासनाची असणारी जान, ज्ञानरचनावादी अध्यापन नवनवीन प्रयोग आणि विद्यार्थ्यांच्या सर्व कस गुणवत्तेचा असणारा ध्यास यासाठी त्यांची असणारी धडपड ही एक त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख आहे.प्रत्येक शाळा ही माझी घर आहे म्हणून वागणारे आदर्श गटप्रमुख म्हणून त्यांची ख्याती आहे त्यांच्या नेतृत्वाचा आणि मार्गदर्शन यांच्या साह्याने समूह साधन केंद्र मोहगाव तिल्ली गोंदिया जिल्ह्यात विविध कार्यात अग्रेसर होती.

प्रत्येक शाळेच्या आवारात प्रवेश झाल्याबरोबर बारीकसारीक गोष्टींचा अभ्यास, निरीक्षण आणि विद्यार्थ्यांना सोबतचा जिव्हाळा आणि मित्रणाप्रमाने सर्व शिक्षकांशी प्रेमपूर्वक वागणूक,काम करवून घेण्याची कसोटी, सर्वां मध्ये असणाऱ्या गुणांना हेरून त्यांना पैलू पाडण्याचे काम करीत गुणग्राहक हंसाप्रमाने समान संधी उपलब्ध करून देणे. नवोपक्रम राबवून नवचैतन्य फुलवीत शिक्षणाचा ध्यास जोपासणारी व्यक्तित्व म्हणजे अगडे सर.जील्हातील कुठल्याही शिक्षणक्षेत्रातील नव्या प्रकल्पाला सुरवत होत असतांना त्यांच्या मार्गदर्शन, सल्ला घेतला जात.त्यांच्या ठायी दुर्दम्य इच्छाशक्ती आणि उत्साह आहे जो प्रत्येकाचा काम करण्यासाठी प्रेरित करीत असायचा.सर विद्यार्थी,शिक्षक,आणि शिक्षण क्षेत्रासाठी एक प्रेरणादायी प्रवास आहे.

*तुमच्याकडून शिकावे*
*कर्तुत्वरुपी उरणे*
*ध्येय आदर्श बाळगावे*
*आयुष्य जगूनी सेवेने*
*मार्गदर्शक जीवनातील*
*पथदर्शी तुम्ही आमचे*
*दीपमाळ वाटेतील*
*सन्मानाने जगण्याचे*
*ऋणी तुमच्या ज्ञानाचा*
*महर्षी तुम्ही शिक्षणाचे*

आज सर सेवानिवृत्त होत आहेत या भावुक प्रसंगी सरांच्या प्रदीर्घ सेवा काळ आणि तोही अतिशय कार्यकुशल आदर्श आणि शिक्षण क्षेत्रासाठी असणारा समर्पण सर्वांसाठी अतिशय प्रेरणादायी आहे .उदात्त भावनेतून त्यांची केंद्रातील शाळांना होणारी मदत आणि मार्गदर्शन सदैव स्मरणात राहतील सरांच्या शाळेतील भेटीतील सामान्य वागण्यातून मिळालेले असामान्य मार्गदर्शन आणि वेळोवेळी सुचविलेले निर्णय उपाय योजना एक शिक्षण क्षेत्रात कार्य करताना मार्गदर्शी असतील .स्वतः आनंदी होऊन इतरांमध्ये आनंद पसरविणाऱ्या असामान्य व्यक्तीस सेवानिवृत्तीच्या निरोगी आणि मंगलमय हार्दिक शुभेच्छा

*गुणवत्तेच्या ध्यासाची उंच मनोरे उभारले तुम्ही…*

*प्रेरणा शिक्षकांची होऊनी*
*नव चैतन्य फुलविले तुम्ही…*

*दैदीप्यमान तुमची कारकीर्द आमची शिदोरी*

*नयन झालीत आर्द्र निरोपाच्या या समयी…*

✒️राजेन्द्र बनसोड(सहायक शिक्षक,जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा निंबा पंचायत समिती गोरेगाव,जिल्हा परिषद गोंदिया)