समोरचा दर्दी असेल तर गर्दी आपोआपच गोळा होते- नंदकिशोर गायकवाड

33
  1. 🔹रयत सेवक मित्र मंडळाच्या राहता मेळाव्यात घेतला विरोधकांचा समाचार…

✒️अहमदनगर(पुरोगामी न्युज नेटवर्क)

अहमदनगर(दि.29ऑक्टोबर):- रयत शिक्षण संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर सेवकांच्या हक्काचे व्यासपीठ असणाऱ्या रयत सेवक मित्र मंडळ या संघटनेची अहमदनगर, कर्जत, श्रीरामपूर, कोपरगाव व आडगाव (नाशिक) या रयत बँक शाखेतील व संघटनेच्या सभासदांची सहविचार सभा शारदा शैक्षणिक संकुल,राहता येथे कोविड नियमांचे पालन करून उत्साहात संपन्न झाली.

सर्वप्रथम रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक *पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील* यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यमान संघटनेचे अध्यक्ष श्री. नंदकिशोर गायकवाड, संघटनेचे मार्गदर्शक व आजच्या सभेचे अध्यक्ष श्री शरद यादव सर, तसेच प्रमुख पाहुणे श्री. बी.पी. बोलगे, श्री.कारभारी वेळजाळी, श्री.अरुण चंद्रे, श्री गुलाबभाई पठाण, श्री मधुकर पवार, विद्यालयाचे मुख्याध्यापक व संघटनेचे उपाध्यक्ष श्री मच्छिन्द्र पिलगर, उपाध्यक्ष श्री. खंडू कांबळे, श्री आर.एस.डोळे, श्री सोमनाथ मरभळ, श्री.पंढरीनाथ राऊत, श्री बाळासाहेब नेटके, मुख्याध्यापक श्री खैरनार, श्री. दिलीप तुपे व मान्यवरांच्या हस्ते झाले. ही सहविचार सभा संघटनेचे मार्गदर्शक *मा. प्रा. श्री. शरद यादव सर यांच्या अध्यक्षतेखाली व संघटनेचे अध्यक्ष श्री. नंदकिशोर गायकवाड* यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली.

कोरोना जागतिक महामारीमुळे मयत झालेले रयत सेवक मित्र मंडळाचे मार्गदर्शक *प्रा. तुकाराम दरेकर सर, रयत सेवक मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष रामनाथ काळे सर विजयराव निकम सर तसेच रयत शिक्षण संस्थेतील सेवक व रयत शिक्षण संस्थेशी जोडले गेलेल्या सर्व ज्ञात अज्ञात मयत व्यक्तींना रयत सेवक मित्र मंडळाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली* अर्पण करण्यात आली.

यावेळी रयत शिक्षण संस्थेत *नवनियुक्त मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक यांचा तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा* उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक मनोगतमध्ये रयत सेवक मित्र मंडळाचे उपाध्यक्ष *प्राचार्य श्री मच्छिंद्र पिलगर* सर यांनी मेळाव्याला उपस्थित सर्व रयत सेवक बंधू भगिनींचे संघटनेच्या वतीने स्वागत केले. रयत सेवक मित्र मंडळाचे सहसचिव *श्री बालाजी बोंबडे* सर यांनी रयत मित्र मंडळ संघटनेने वेळोवेळी केलेल्या मागण्यांमधील प्रामुख्याने *नियमानुसार व पारदर्शक बदली प्रक्रिया, सेवाजेष्ठतेबाबत कायदेशीर अंमलबजावणी, पारदर्शी पदोन्नती प्रक्रिया, कलाशिक्षक पदवीधर वेतनश्रेणी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पदोन्नती* याबद्दल संघटनेच्या पातळीवर पाठपुरावा करत असून संस्था प्रशासन सेवकांच्या प्रश्नांची दखल घेऊन सकारात्मक निर्णय घेत आहे. मात्र विरोधक न केलेल्या कामाचे फुकट श्रेय घेण्यासाठी धडपडत आहेत. वास्तविक आजपर्यंत निवेदने देण्यापलीकडे त्यांनी काय केले, अशी नाराजी व्यक्त केली. आतापर्यंत रयत सेवक मित्र मंडळाने पदाधिकाऱ्यांच्या समवेत वेळोवेळी चर्चा केली.

आंदोलने केली, अगदी न्यायालयीन लढा दिला. या सगळ्या गोष्टी सर्वसामान्य सेवकांना माहीत आहेत. मागील काही वर्षांपासून संघटना सेवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आग्रही भूमिका घेत असल्यामुळे दिवसेंदिवस सेवकांचा संघटनेवरील विश्वास वाढत चाललेला आहे. याचाच फायदा पुढील काळात होणाऱ्या रयत सेवक को. ऑप. बँकेच्या निवडणुकीत दिसून येईल. तसेच सभासद हिताच्या दृष्टीने ठोस निर्णय घेणारे खंबीर संचालक मंडळ रयत सेवक मित्र मंडळाच्या माध्यमातून सभासद निवडून देतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

रयत मध्ये गैरव्यवहार करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायला पाहिजे. नुसते नोकरीतून कमी करण्यापेक्षा पूर्ण चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करायला हवे होते. यापुढे स्वच्छतेचे हे काम मित्र मंडळाला करावे लागेल. असे मत *माजी संचालक श्री कारभारी वेलजाळी सर* यांनी व्यक्त केले. *श्री अरुण चंद्रे सर* यांनी रयत शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन कर्मवीर शंकरराव काळे साहेब यांच्या सत्यवादी विचारांची आठवण रयत सेवकांना करून देत सांगितले की, नेहमीच काळे कुटुंबिय रयत मित्र मंडळाच्या पाठीशी राहिलेले आहे. यापुढेही राहील. अशी अपेक्षा व्यक्त केली.

प्रमुख पाहुणे रयत बँकेचे माजी चेअरमन व संघटनेचे मार्गदर्शक *श्री बी. पी. बोलगे सर* यांनी रयत बँक ही सभासदांचीच बँक आहे आणि मित्र मंडळ हे संस्थेच्या विरोधात नसून लाचार व भ्रष्टाचारी लोकांच्या विरोधात नक्कीच असेल, असे ठणकावून सांगितले. उपप्राचार्य *श्री. आर एस डोळे* यांनी जुन्या काळातील संघटना व सध्याच्या काळातील संघटना यामध्ये परिस्थितीनुसार फरक पडला असून सध्या नेतृत्व व कर्तृत्व या दोन्ही बाबतीत नवीन पिढी काम करत असल्याचे समाधान व्यक्त केले. निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी उमेदवारी मिळण्याची वाट न पाहता स्थानिक शाखाभेटी व सभासदांच्या संपर्कात राहावे, असे सांगितले. *प्रा. अशोक झरेकर* यांनी सभासदांची बँक सभासदांच्या हितासाठीच काम करेल आणि धाडसाने निर्णय घेण्याची मित्र मंडळात धमक असल्याने सभासदांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता मित्र मंडळाच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन केले. याशिवाय श्री थोरात व श्री निकाळे या सभासदांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी प्रमुख वक्ते, मित्र मंडळाची बुलंद तोफ आणि संघटनेचे विद्यमान अध्यक्ष *श्री. नंदकिशोर गायकवाड* यांनी विरोधक, विद्यमान संचालक यांचा समाचार घेत निवडणूक मुद्यावर लढली पाहिजे, मात्र विरोधकांकडे मुद्देच नसल्यामुळे भीतीचा बागुलबुवा उभा करत असल्याचे मत व्यक्त करून निवडणुकीसाठी सभासदांसमोर मांडण्यात येणाऱ्या जाहिरनाम्याच्या दृष्टीने *पारदर्शक व विश्वासार्ह* कारभाराची ग्वाही देऊन 1) इतर सहकारी बँकेच्या तुलनेत सर्वात कमी व्याजदर.
2) सभासदांना तातडीने 50,000 रुपयांपर्यंत वैद्यकीय क्रेडिट सुविधा.
3) सभासदांच्या संपूर्ण कर्जाला विमाकवच घेऊन 15 लाखाऐवजी ही मर्यादा वाढवून जास्तीतजास्त कर्ज माफ होऊन मयत सभासदांच्या कुटुंबाला व जमीनदारांना अभय.
4) सभासदांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ग्राहक सेवा सुविधा.
5) सभासदांना बँकेत किमान चहापाणी सन्मानाची वागणूक देऊन त्यांच्या सुखदुःखात सहभागी. तसेच निवृत्तीनंतर तात्काळ सन्मानाने निरोप.
6) घर बांधणी व वाहन कर्जासाठी कमीत कमी (राष्ट्रियीकृत बँकेप्रमाणे) कागदपत्रे व तत्परतेने कर्जयोजना.
7) सभासदांना कॕलेंडरप्रमाणेच भेट वस्तू, डायरी. पाचही विभागात जनरल मिटींग.
8) रयत सेवक को. ऑप बँक सभासदांना किमान 15% लाभांश व मागील राहिलेला लाभांश देणार.
9) सभासदांना मेडिक्लेम विमा योजना
10) अतिरिक्त मधून आलेल्या सेवकांना खात्रीने रयत बँकेचे सभासद करून सभासद संख्या वाढवणे.

या मुद्यासोबतच पंजाब महाराष्ट्र को. ऑफ. या डबघाईला आलेल्या बँकेत ठेवलेली रयत बँकेची 11कोटी रुपयाची ठेव, जनरल मॕनेजरचा तडकाफडकी राजिनामा, यामागे नेमके काय लपलंय, याचे उत्तर संचालक मंडळाला द्यावे लागेल. तसेच संस्थेच्या आजीमाजी पदाधिकाऱ्यांना पुढे करून विद्यमान संचालक मंडळातील काही लोक व विरोधी संघटनेचे काही लोक चौथा पॕनेल उभे करण्यासाठी धडपडत आहेत. संस्थानिष्ठेच्या गप्पा मारून लढण्यापेक्षा पदाची झूल बाजूला ठेवून आखाड्यात उतरा म्हणजे कळेल कोण किती पाण्यात आहे. नाशिक जिल्ह्यात दमबाजी करून व जेवणाचे आमिष दाखवून काही पदाधिकारी मिटींगला गर्दी जमवतात. आमच्या मिटींगला *गर्दी नाही तर दर्दी* जमतात. सोलापूर जिल्ह्यात तर मिटींगचे निमंत्रण देण्यासाठी चक्क एका शाळेच्या कार्यालयीन मेलआयडीचा वापर केल्याचे सांगत असे बेजबाबदार वागण्यामागे रयत मित्र मंडळाची वाढती ताकद व सर्वसामान्य सेवकांचा मित्र मंडळाला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकत चालली आहे. त्यांच्या जुन्या चेहऱ्यांना किंमत राहिली नसल्यामुळे ठिकठिकाणी संघटनेच्या पदांची खैरात वाटप चालली असून ऐनवेळी अशी पदे देऊन लोकांना किती दिवस भुलवणार असा प्रश्न केला. आतापर्यंत संचालक मंडळात तुमचेच लोक असून पुन्हा नवीन चेहऱ्यांना घेऊन आम्हांला संधी द्या म्हणणे, म्हणजे सभासदांची फसवणूक असून सभासद याला बळी पडणार नाहीत. आता लोकांना बदल हवाय. मित्र मंडळ ते परिवर्तन करून दाखवेल. आताची पिढी ही अन्याय सहन करणारी नाही तर अन्यायाला वाचा फोडणारी आहे. त्यामुळेच *विरोधकांनी मुद्यावर यायचे की गुद्यावर* तो निर्णय घ्यावा. आम्ही तयार आहोत. असेही यावेळी ते म्हणाले.

मेळाव्याचे अध्यक्ष व संघटनेचे मार्गदर्शक *मा. प्रा. श्री. शरद यादव सर* यांनी संघटनेच्या मागील काळातील आढावा घेऊन पुढील ध्येयधोरणाविषयी मार्गदर्शन केले. *आमचे आता वय झाले असल्यामुळे योग्यवेळी पुढील पीढीकडे कारभार द्यायचा असतो, आज आमच्याकडे दिडशे तरूण पोरांची फौज पुढे जमलीय. तर विरोधक सभासद नसलेल्या लोकांची गर्दी जमवून काय करत आहेत,* असा टोला त्यांनी लगावला. रयत सेवक को. ऑप. बँकेच्या आगामी निवडणूकीविषयी सविस्तर चर्चा करून आगामी निवडणुकीत सर्वच्या सर्व 17 जागा संघटनेच्या वतीने लढवण्याचा ठामपणे निर्णय घेण्यात आला.

सहविचार सभेसाठी *अहमदनगर, नाशिक, पुणे, सातारा आणि सोलापूर* जिल्ह्यातील सभासद उपस्थित होते. संघटनेचे उपाध्यक्ष श्री खंडू कांबळे, सचिव श्री भिमा लेंभे, कोषाध्यक्ष श्री सुहास भावसार, सहसचिव श्री बापू काळे, संघटक श्री दिपक भोये व श्री जनार्दन खेताडे, श्रीम आशालता शिंदे, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष श्री दिलीप तुपे, उपाध्यक्ष सौ अनुसया मरभळ, जिल्हा सहसचिव श्री शिवदास सातपुते, श्री प्रवीण निळकंठ, पुणे जिल्हा माजी उपाध्यक्ष श्री. गोरख गायकवाड, सोलापूर जिल्हाध्यक्ष दादासाहेब गाडे सचिव श्री श्रीराम केदार, श्री सुरेश तिटकारे, सातारा जिल्हा सहसचिव डॉ. धनंजय कच्छवे, नाशिक जिल्हाध्यक्ष श्री गोरख बोरसे, उपाध्यक्ष प्रशांत शिरसाठ इत्यादी सर्व कार्यकारिणी पदाधिकारी, तसेच उत्तर विभागातील रयत सेवक बहुसंख्येने उपस्थित होते. सभा यशस्वी होण्यासाठी उपाध्यक्ष श्री मच्छिन्द्र पिलगर, शारदा विद्यामंदिरचे उपमुख्याध्यापक श्री नारायण नाईक व सचिव श्री भिमा लेंभे यांच्या नेतृत्वाखाली श्री राजू गायकवाड, श्री भागचंद जोशी, श्री रावसाहेब लांडगे, श्री भानुदास निर्मळ, श्री. घोडे, श्री अरविंद वसावे, श्री सचिन सोनवणे, श्री विजय कोकणी व शारदा शैक्षणिक संकुलातील संघटनेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
सभेचे सूत्रसंचालन श्री. रमेश आहेर व श्री शरद गमे यांनी केले. *श्री.शिवदास सातपुते* यांनी उपस्थितांचे, संस्था प्रशासन व सहविचार सभेसाठी हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल विद्यालयाचे प्राचार्य श्री.मच्छिन्द्र पिलगर यांचे आभार मानले. राष्ट्रगीताने सभेची सांगता करून कर्मवीर घोषाने सर्व सभागृह दुमदुमून गेले.

*सेवकांची एकजूट…*
*न्यासाठी वज्रमूठ…*

*सावधान! सावधान!! वणवा पेट घेत आहे…*

*जय कर्मवीर.*