कोविड १९ लसीकरण ही काळाची गरज – किशोर हंबर्डे

29

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.29ऑक्टोबर):-तालुकाका शिक्षण प्रसारक मंडळाचे अँड बी.डी.हंबर्डे महाविद्यालय,आष्टी येथे बोलताना वरील मत संस्था अध्यक्ष किशोर हंबर्डे यांनी व्यक्त केले,यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,आरोग्य विभाग खुप चांगले काम करत आहे,त्यांच्या प्रयत्नांमुळे व राष्ट्रीय सेवा योजना विभागा सारख्या समाजसेवा करणाऱ्या युवकांमुळे आज माणूसकी जिवंत आहे.आरोग्य विभागाने कोविड १९च्या अतिशय कठीण काळात देशाची सेवा केली आहे.आज राबविलेली लसीकरण मोहिम हे त्यांचे पुढचे पाऊल आहे.तेव्हा सर्वांनी या मिशन युवा स्वास्थ्य मध्ये सहभागी होऊन जास्तीत जास्त संख्येने लसीकरण करून घेऊन देशांचे शक्ती बनण्याचा प्रयत्न करा असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी त्यांनी स्वतः लसीचा दुसरा डोस घेतला व पहिला डोस आनंदराव धोंडे महाविद्यालय,कडा येथे घेतल्याचे सांगून लसीकरण शिबीरास शुभेच्छा दिल्या.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जयश्री शिंदे,डॉ.नितीन मोरे,डॉ.प्रसाद वाघ,डॉ.अनिल अरबे,डॉ.संध्या लाड,तुषार जानवळे,सि.एच.ओ.,दिगांबर भोगाळे,संतोष कोल्हे,गर्जे एन.एस.,विजया जोशी,गंचाडे,सौरभ सपकाळ,उपप्राचार्य डॉ.बाबासाहेब मुटकुळे,उपप्राचार्य प्रा.अविनाश कंदले, IQAC समन्वयक प्रा.निवृत्ती नानवटे व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.रवी सातभाई,डॉ.सुहास गोपणे,प्रा.शुभांगी खुडे यांनी परीश्रम घेतले.