भिसी- शंकरपूर कान्पा व चिमुर- वाकर्ला बससेवा त्वरित चालू करा शुभम मंडपे यांची मागणी

29

🔸परिसरातील नागरिकांना नाहक त्रास

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

भिसी(दि.29ऑक्टोबर):- शंकरपूर हा महामार्ग असून या मार्गाने भिसी , पुयारदंड , गडपीपरी , गोठणगाव , बोरगाव (डोये) , चिचाळा (शा) , लावारी व आंबोली शंकरपूर येथील नागरिक व शेतकरी शेतमजूर व विध्यार्थी या मार्गाने जाणे- येणे करीत असतात मात्र या मार्गाची बससेवा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने बंद केली आहे तसेच
चिमुर -आंबोली-वाकर्ला या मार्गाने अगोदर नियमित बससेवा चालु होती मात्र कोरोना काळापासून ही बससेवा बंद आहे व वाकर्ला हे गाव चंद्रपूर – नागपूर सीमेवरील शेवटचे गाव आहेव वाकर्ला गावावरून शेतकरी – शेतमजुर आंबोली येथून येणे -जाणे करीत असतात व विध्यार्थी हे शिक्षन घ्यायला आंबोली येथे येत असतात व आता शाळा चालु झाल्याने विद्यार्थ्यांना खूप मोठी अडचण भासत आहे.

व आंबोली गावामध्ये राष्ट्रीयकृत बँक महाराष्ट्र असल्याने शंकरपूर व भिसी परिसरातील नागरिक आंबोली येथे येजे -जाणे करीत असतात त्यामुळे भिसी-शंकरपूर कान्पा व चिमुर – वाकर्ला बससेवा चालू करन्याची परिसरात मागनी होत आहे व त्यामुळे आंबोली ग्राम पंचायत चे सदस्य व सम्यक विध्यार्थी आंदोलनाचे चिमुर तालुका अध्यक्ष शुभम मंडपे यांनी भिसी – शंकरपूर कान्पा व चिमुर – वाकर्ला ह्या दोन्ही मार्गाची बससेवा त्वरित व लवकरात- लवकर सुरू कराव्यात याची मागणी चिमुर चे आगार प्रमुख यांना निवेदनाच्या माध्यमातून केली आहे व कोरोना काळापासून ह्या दोन्ही मार्गाची बससेवा बंद आहे.

तरी लवकर याची दक्षता न-घेतल्यास सम्यक विध्यार्थी आंदोलन चिमुर कडून आंदोलनही करू याचा इशारा देण्यात आला E3यायावेळीं निवेदन देताना आंबोली ग्राम पंचायत चे सदस्य व सम्यक विध्यार्थी आंदोलनाचे चिमुर तालुका अध्यक्ष शुभम मंडपे व तालुका संगटक निखिल रामटेके , मनोज राऊत , भाग्यवान नांदेशवर ,गौतम धनविजय , मंगेश मुन , सुरज गायकवाड , आकाश धनविजय , योगेश गेडाम , ताजुल मेश्राम , संदीप बन्सोड , नमितोश लोखंडे , शैलेश गायकवाड जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मधुकर नागपुरे उपसरपंच वैभव ठाकरे व सम्यक विध्यार्थी आंदोलनाचे पदाधिकारी उपस्थित होते

– —- ——

“भिसी – शंकरपूर कान्पा हा मार्ग पुयारदंड , गोठणगाव , गडपीपरी , बोरगाव(डोये), चिंचाळा (शा), आंबोली, वाकर्ला,या गावातील नागरिकांना महामंडळाची बस बंद असल्यामुळे खूप त्रास होत आहे तरी महामंडळाने लवकरात – लवकर बससेवा चालु करावी अशी विन्नती करन्यात आली व दक्षता न घेतल्यास आंदोलनही करु असा इशारा निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला”

शुभम मंडपे (ग्राम पंचायत सदस्य आंबोली, तालुका अध्यक्ष सम्यक विध्यार्थी आंदोलन चिमुर)