✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-८६०५५९२८३०

चिमूर(दि.२९ऑक्टोबर):- राष्ट्रीय पेन्शन योजना हटविण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच भाग म्हणून ग्रामसेवक युनियनने पंचायत समिती चिमूर समोर ठिय्या आंदोलन केले.

१ नोव्हेंबर २००५ पासुन महाराष्ट्र शासनाने पारिभाषिक अंशदायी पेन्शन योजना राज्य सरकारी कर्मचा-यांना लागु केली. सन २०१५ पासुन या योजनेचे रुपांतर राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये करणात आली. १६ वर्षापासून कर्मचा-यांचा हक्क डावलल्यामुळे कमालीचे भरडलेले जात आहे. म्हणून ग्रामसेवक युनियनने राष्ट्रीय पेन्शन योजना हटवून जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी पंचायत समिती चिमुरचे बि. डी. ओ. यांना सादर केलेल्या निवेदनातुन केली आहे.

निवेदनात अनेक राज्याने जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात केन्द्रशासनाकडे शिफारस करावी, केन्द्र शासन कर्मचा-यांना मिळणारे कुटुंब निवृत्ती वेतन योजना राज्य सरकारी कर्मचा-यांना लागु करावी, राज्य सरकारी कर्मचा-यांना १० टक्के अंशदानाऐवजी १४ टक्के वजावट आयकरासाठी एकूण उप्तंनातुन द्यावे आदी मागण्याचा समावेश होता.

यावेळी तालुका कार्यकारणीचे अध्यक्ष डी. एस. बांगडे, सचिव विठ्ठल नखाते, जिल्हा सहसचिव संजीव ठाकरे, सरचिटणीस समर्थ, उराडे, तालुका उपाध्यक्ष हरिहर ढोले, पोवारे, कामडे, भसारकर, नरड व इतर डीसीपीएस धारक व इतर सर्व ग्रामसेवक उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED