✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.29ऑक्टोबर):- येथे दिनांक 28 आक्टोबर रोजी श्रीलंका ऑस्ट्रेलिया यांचा ट्वेंटी-ट्वेंटी किर्केट सामान्यवर सट्टा बाजार चालत असताना माहिती मिळाली असता सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, सपपोलीस निरीक्षक गायकवाड,पोलीस उपनिरक्षक घोगरे, पोलीस कर्मचारी जोंधळे,कोंढरे, शिरसाठ,बोंमसेठे, तजोद्दीन,यांच्या पथकाने कर्यवाई केलीअसून .गंगाखेड पोलीसाचे पथक अवैद्य कारभार ची माहिती काडत आसथाना सदरील पथकाला ओम नगर येथे श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या सामना खेळत असताना या सामान्यवर काही जण सट्टा लावत असल्याची माहिती मिळाली असता या माहितीच्या आधारे पोलिसांनी सुनील कांचनराव पेकम यांच्या घरावर धाड टाकली असता याठिकाणी लॅपटॉप,मोबाईल, रोख रक्कम वीस हाजार सातसे रुपये आसा एकूण एकलाख तेवीस हाजार आठसे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

असून सुनील पेकम याला ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी विजय अय्या आणि लखन यादव यांच्या भागीदारीने सट्टा चालवतोत असी माहिती सांगितली तर दुसऱ्या कार्यवाई गंगाखेड येथील नगरेश्वर गल्ली येथे करण्यात आली असून या ठिकाणी बालासाहेब विजयराव पुरनाळे मयांच्या कडून सट्टयात वापरण्यात येणारे साहित्य मिळून वीस हाजार पाचसे रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी बाळासाहेब पुरनाळे,विजय भरत अय्या यांच्यावर गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे पोलिसानी आरोपीना ताब्यात घेतले असून इतर सट्टे बाजेंचा शोधसुरु असून या कारवाही मुळे सट्टे बाजाराचे धाबे दनाणले आहेत.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED