राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमूर येथे मिशन युवा स्वास्थ अभियान

25

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.30ऑक्टोबर):-संपूर्ण जगभर कोविड १९ ने थैमान घातल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनातर्फे लसीकरण हाती घेतले आहे. त्यादृष्टीने गांधी सेवा शिक्षण समिती चिमूर द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग, राष्ट्रीय छात्र सेना व विद्यार्थी विकास परिषद तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे मिशन युवा स्वास्थ अभियानाअंतर्गत प्राथमिक स्वास्थ्य केंद्र जांभूळघाट यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला मिशन युवा स्वास्थ अभियानाला गांधी सेवा शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. दिपक यावले, सचिव विनायक कापसे, संस्थेचे पदाधिका-यांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य प्रा. कार्तिक पाटील, राष्ट्रीय छात्र सेना विभागाचे लेफ्टनंट प्रा. डॉ. प्रफुल्ल बन्सोड , राष्ट्रीय सेवा विभागाचे विभागीय समन्वयक तथा कार्यक्रम अधिकारी प्रा. पितांबर पिसे, विद्यार्थी विकास परिषदेचे प्रभारी प्रा. डॉ. हरीश गजभिये, आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. मुकुल करिये, डॉ. मेश्राम व वैद्यकीय चमू प्रामुख्याने उपस्थित होते.

मिशन युवा स्वास्थ अभियानामध्ये महाविद्यालयातील १८ वर्षावरील विद्यार्थांना प्रथम व व्दितीय डोस देण्यात आले. शिबिर यशस्वी करण्याकरीता महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद डॉ. नितीन कत्रोजवार, डॉ. राजेश्वर रहांगडाले, डॉ. लक्ष्मन कामडी, डॉ. उदय मेंडूलकर, नॅक समन्वयक प्रा. आशुतोष पोपटे, प्रा. गुणवंत वाघमारे तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी, आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, राष्ट्रीय छात्र सेना कॅडेट, विद्यार्थी विकास विभागाचे मोलाचे सहकार्य लाभले.