🔸खा.अशोकजी नेते यांच्या नेतृत्वात गोटूल समितीची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

✒️गडचिरोली प्रतिनिधी(चक्रधर मेश्राम)

गडचिरोली(दि.30ऑक्टोबर):-आदिवासी गोटुल समीतीची अतिक्रमीत वनजमीन समितीला हस्तांतरित करण्याबाबत मा.जिल्हाधिकारी, वनविभागाचे अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी व वनहक्क समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पार पडली.

जिल्हा आदिवासी गोटुल समीतीने 1991 पासुन अतिक्रमण करून त्या गोटुल भुमीवर गोटुल समीती आदिवासींचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम गेल्या 30-31वर्षी पासुन करीत आहेत. ती जमीन आदिवासी गोटुल समीतीला द्यावी, अशी मागणी मा.खासदार अशोक जी नेते राष्ट्रीय महामंत्री भाजपा जनजाती मोर्चा यानी मा.जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्याकडे केली.
मा.जिल्हाधिकारी, गडचिरोली यानी वनविभागाचे अधिकारी याना जमीन देण्याबाबत सुचना दिल्याने गेली 30-31 वर्षा पासुन प्रलंबित असलेल्या गडचिरोली चांदाळा मार्गावरील आदिवासी गोटुल भुमी चा प्रश्न निकालात निघनार आहे.

मा.खा.अशोकजी जी नेते साहेब यांच्या नेत्रुत्वातील शिष्टमंडळात श्री प्रकाश गेडाम प्रदेश सरचिटणीस, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा महाराष्ट्र तथा दिशा समीती जिल्हा सदस्य, गडचिरोली.मा.नंदुभाउ नरोटे.अध्यक्ष जिल्हा आदिवासी गोटुल समीती, गडचिरोली. समाजसेवक मा.देवाजी तोफा.उपाध्यक्ष गोटुल समीती. मा.अणीलजी कुनघाडकर उपाध्यक्ष न.प.गडचिरोली, मा.भरतजी येरमे.अध्यक्ष आदिवासी कर्मचारी संघटना, गडचिरोली.मा.अँडमोहनजी पुराम, सरचिटणीस गोटुल समीती,गडचिरोली. मा.ईंजी. मोहनजी गावड. कार्याध्यक्ष, आदिवासी कर्मचारी संघटना. इंदिरानगर येथील वनहक्क समीती चे अध्यक्ष राजेंद्र कुकुडकर, समितीचे पदाधिकारी, वनविभाग, महसूल विभाग, न.प.मुख्याधिकारी उपस्थित होते.

गडचिरोली, महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED