माजीमंत्री बदामराव पंडित यांच्या हस्ते ३० लक्ष रूपये डांबरी रस्त्याचे तलवाडयात उदघाटन

27

✒️तलवाडा प्रतिनिधि(शेख आतिख)

तलवाडा(दि.30ऑक्टोबर):- येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पोलिस ठाणे रस्ता व अंबिकानगर ते केकत पांगरी रस्ता प्रत्येकी ७५० मिटर इतके अंतराचे एकूण ३० लक्ष रूपयाचे डांबरीकरण रस्त्याचे उदघाटन शनिवारी माजीमंत्री बदामराव पंडित यांच्या हस्ते करण्यात आले. या उदघाटन सोहळयास शिवसेनेचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

माजीमंत्री बदामराव पंडित यांच्या अथक प्रयत्नातून हे या कामाला मंजूरी मिळाली असून हे काम जिल्हा नियोजन आराखडयातून जि.प.सदस्य युवराज डोंगरे करणार आहेत. अतिशय खराब झालेला हा रस्ता आता दर्जेदार होणार असून तलवाडा व परिसरातील लोकांनी बदामराव पंडित यांचे आभार मानून धन्यवाद दिले आहेत.

या उदघाटन कार्यक्रमास राजाभाऊ खिस्ते, शिवसेना गटनेते गोविंदप्रसाद जोशी, पिन्टूशेठ गर्जे, मदन करडे, माजी सभापती गिताराम डोंगरे, अशोक आठवले, अंबादास आठवले, खतीब खदीर, शेख खलील भाई, कैलास राठोड, रामभाऊ राठोड, वैभव शिनगारे, रामकिसन वावरे, श्रीमंत यादव, गणेश चव्हाण, पप्पू चौधरी, भुजंग शेळके, भागवत नाटकर, परसराम मिंड, बंडू निकम, संतोष निकम. मंजित शिंदे, रमेश थोरात, पप्पू तेलुरे, शिवसेना सर्कल प्रमुख शेख रफिक, चंदू मस्के, शंकर नाटकर, नारायण जाधव, बंटी भांबरे, नवनाथ भांबरे यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा यादरम्यान माजीमंत्री बदामराव पंडित यांची वाजत गाजत भव्यदिव्य मिरवणूक काढून त्यानंतर डांबरीकरण कामाचे उदघाटन करण्यात आले. विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही असे यावेळी बोलतांना बदामराव पंडित यांनी सांगितले.