गेवराई पोलिसांनी दरोडेखोरांच्या मुद्देमालासह आवळल्या मुसक्या

28

🔺शहागड बुलढाणा अर्बन शाखेतील 1 कोटींची चोरी करणाऱ्या आरोपींना बेड्या

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.30ऑक्टोबर):-28 ऑक्टोबर रोजी जालना जिल्ह्यातील शहागड येथील बुलडाणा अर्बनच्या शाखेतून तीन आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवून 75 लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांसह 25 लाखांची रोख रक्कम पळवली होती. या बँकेत 3 आरोपींनी हा दरोडा टाकला होता. ही संपूर्ण घटना सीसीटिव्ही कॅमेरामध्ये कैद झाली होती.

या प्रकरणी जालन्यातील गोंदी पोलिसांनी गुन्हा दखल केला होता. हा दरोडा टाकणाऱ्या 3 पैकी 2 आरोपींना गेवराई येथून अटक करण्यात आली आहे. गेवराई पोलिसांनी दोन आरोपींच्या मुसक्या आवळून या आरोपींना गोंदी पोलीसांच्या ताब्यात दिलं आहे. पुढील तपास गोंदी पोलिस करत आहेत. पोलीसांच्या या कारवाईचं सर्वत्र कौतुक होत आहे.