आयुष्यात पराक्रम घडवायचे असतील तर अंमली पदार्थापासून दूर रहा – ॲड.आशिष गोंडाने

25

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.30ऑक्टोबर):- कोणत्याही देशाचा उज्वल भविष्य हा त्या देशाचा विद्यार्थी कसा आहे यावर अवलंबून असून विद्यार्थ्यांना जर आपल्या आयुष्यात पराक्रम घडवायचे असतील तर त्यांनी अंमली पदार्थांपासून दूर राहावे असे प्रतिपादन ॲड.आशिष गोंडाने यांनी केले.राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर यांच्या निर्देशान्वये तालुका विधी सेवा समिती ब्रम्हपुरी अंतर्गत स्थानिक डाँ. पंजाबराव देशमुख कन्या कनिष्ठ महाविद्यालय ब्रम्हपुरी येथे कायदेविषयक जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी ते बोलत होते.

ॲड.आशिष गोंडाने पुढे म्हणाले की अंमली पदार्थाचे सेवन म्हणजे मनुष्यामात्राच्या आयुष्याला लागलेली कीड आहे.या किडीचे उच्चाटन व्यसनाधीन व्यक्तीला स्वतःच करायचे आहे.जे व्यक्ती व्यसनाधीन नाहीत त्यांनी कधीही व्यसन स्वतःला जडू नये व जे व्यक्ती व्यसनाच्या आहारी गेले आहेत त्यांचे प्रबोधन करून त्यांना मुख्य प्रवाहात आनणे आपले कर्तव्य आहे असे ॲड.आशिष गोंडाने आपल्या मार्गदर्शनात म्हणाले.

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य शारदाताई ठाकरे मॅडम तर प्रमुख अतिथी म्हणून गोवर्धनजी दोनाडकर सर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.सुभाषचंद्र खोब्रागडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.हेमलता बगमारे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता न्यायालयीन कर्मचारी एच.जी खोब्रागडे(वरिष्ठ लिपिक),साबेर काझी (कनिष्ठ लिपिक),नरेश पेंदोर (शिपाई)तर पोलीस विभागातर्फे पो.हवा सुदेश कुमरे,प्रकाश दुफारे यांनी मोलाचे सहकार्य केले.