युवासेना धुळे जिल्हा ग्रामिणच्या वतीने पेट्रोल व डिझेल दरवाढी विरोधात दोंडाईचा,शिरपुर,शिंदखेडा येथे सायकल रॅली संपन्न

29

🔸युवासेना जिल्हाप्रमुख आकाश कोळी यांची माहिती

✒️प्रतिनिधी दोंडाईचा(सांजय कोळी)

दोंडाईचा(दि.३१ऑक्टोबर):- रोजी युवासेना प्रमुख तथा पर्यावरण राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार व युवासेना सचिव वरूणजी सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली संपुर्ण महाराष्ट्र भर इंधन दरवाधी वाढती विरोधात राज्यव्यापी सायकल रॅली आंदोलन युवासेना धुळे जिल्हा ग्रामिणच्या वतीने युवासेना जिल्हा प्रमुख आकाश कोळी यांच्या प्रमुख उपस्थिती पार पडले, दोंडाईचा शिरपूर शिंदखेडा या तीन ठिकाणी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देत सायकल रॅली पार पडली शिरपुर तालुका उपजिल्हायुवाधिकारी अनिकेत बोरसे विजय पवार जितेंद्र राठोड यांनी शिरपुर रॅलीचे नेतृत्व केले.

तर शिंदखेड्यात युवासेना जिल्हासमन्वयक गणेश परदेशी व तालुका प्रमूख प्रदिप पवार यांनी तर दोंडाईचा शहरात युवासेना उपशहरप्रमुख योगेश बोरसे,गणेश विसावे,सुरेश कोळी,लखन मराठे,नरेंद्र धात्रक,जयेश बडबुजर,मोहित राजानी, नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले होते यावेळी शिवसेनेचे उजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनावणे, भरत राजपुत तालुकाप्रमुख ईश्वर पाटील,गिरीश देसले उपजिल्हा,अत्तरसिंग पावरा,दीपक चोरमले उपजिल्हा संघटक विभाजोग राणा उपतालुका प्रमुख शैलेश सोनार,राका शेठ,आबा चित्ते विजय वाडीले,चुडामन बोरसे,शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते…