✒️ नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.31ऑक्टोबर):-शासकीय सेवेत सामावून घेण्यास टाळाटाळ होत असल्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण सुरूवात केली आहे.

येवला तालुक्यातील नगरसुल ग्रामपंचायतीचे वरिष्ठ लिपिक कर्मचारी दिलीप संपत निकम हे नगरसुल ग्रामपंचायत मध्ये दिनांक 1/3 /2005 पासून लिपिक या पदावर कार्यरत असताना अचानक संबंधित ग्रामपंचायत सरपंच, ग्राम विकास अधिकारी यांनी दिलीप संपत निकम यांना बडतर्फ केल्याची ५/३/२०१९ रोजी नोटीस बजावली असता संबंधित नोटीस विरुद्ध माननीय गट विकास अधिकारी पंचायत समिती येवला यांच्याकडे दिलीप संपत निकम यांनी४/४/२०१९ रोजी दाद मागितली असता दिलीप निकम यांना पुन्हा सेवेत सामावून घेण्याचे आदेश गटविकास अधिकारी यांनी दिले परंतु संबंधित सरपंच ग्राम विकास अधिकारी यांनी या आदेशाला न जुमानता अद्यापही सेवेत सामावून घेतलेले नाही म्हणून दिलीप संपत निकम हे सेवेत सामावून घेण्यासाठी पंचायत समिती येवला येथे आमरण उपोषण करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले दिलीप संपत निकम हे ४/११/२०२१ रोजी शासनाच्या वय मर्यादेनुसार सेवानिवृत्ती होत असून ते सेवानिवृत्ती लाभापासून वंचित राहू नये व बडतर्फ कालावधी मधील वेतन मिळावे.

तसेच सेवानिवृत्तीनंतर उपदान अर्जित रजा लाभ मिळावा व सेवेत पूर्ववत सामावून घेण्यासाठी पंचायत समिती कार्यालय समोर आमरण उपोषण करत असून अद्यापही या उपोषणाची दखल कोणत्याच अधिकाऱ्यांनी घेतलेली नसल्याचे दिलीप संपत निकम यांनी सांगितले आहे संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले तरी न्यायव्यवस्थेवर संपुर्ण विश्वास असून न्याय मिळवण्यासाठी दिवाळीच्या सुट्टीचा कालावधी मध्ये आमरण उपोषण कायम ठेवले जाईल असे दिलीप संपत निकम यांनी सांगितले.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED