✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.31ऑक्टोबर):-वारंगल तेलंगणा व दिल्ली येथे पार पडलेल्या नॅशनल चॅम्पियन स्पर्धेत नाशिकच्या विजयी खेळाडूंचा नाशिक भुजबळ फार्म येथील कार्यालयात राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

यावेळी क्रीडा प्रशिक्षक विजेंद्र सिंग, अनिल वाघ, हेमंत देशपांडे आदी उपस्थित होते.

वारंगल तेलंगणा येथे पार पडलेल्या ६० नॅशनल चॅम्पियन स्पर्धेत महाराष्ट्र राज्याला एकूण पाच पदके मिळाली. त्यातील ४ पदके ही नाशिकच्या खेळाडूंना मिळाली आहे. तसेच दिल्ली येथे झालेल्या २३ व्या नॅशनल चॅम्पियन स्पर्धेत महाराष्ट्राला एकूण ८ पदके मिळाली त्यातील ६ पदके नाशिकच्या खेळाडूंना मिळाली आहे.

यामध्ये संजीवनी जाधव हिला १ गोल्ड, १ सिल्व्हर मेडल, कोमल जगदाळे हिला २ गोल्ड व २ सिल्व्हर मेडल, आदेश यादव यास १ गोल्ड, किसन तडवी यास १ गोल्ड तर अजय राठी यास १ गोल्ड व २ सिल्व्हर मेडल मिळाले. या सर्व खेळाडूंचा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सर्व खेळाडूंना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या खेळाडूंना नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, क्रीडा व कल्याण विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया व महेंद्रा व महेंद्रा यांचे सहकार्य लाभले.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED