दिग्रस येथे वर्षावास कार्यक्रम संपन्न

30

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

दिग्रस(दि.31ऑक्टोबर):-भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा दिग्रस च्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पडगिलवार ले आऊट येथे वर्षावास समारोप कार्यक्रम संपन्न झाला.सुरवातीला वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा दिग्रस चे अध्यक्ष विनायक देवतळे व प्रमुख वक्ते प्रा सिद्धार्थ गायकवाड तालुका शाखा दारव्हा प्रमुख पाहुणे डॉ प्रा खुशाल ढवळे सचिव जिल्हा शाखा यवतमाळ, प्रमुख उपस्थिती महादेव धुळध्वज, गौतम भोवते, मिलींद मानकर, उध्दव अंबुरे,प्रा मधुकर वाघमारे डॉ वाल्मिक इंगोले हे होते.तथागताचा मध्यममार्ग या विषयावर प्रा सिध्दार्थ गायकवाड यांनी अतिशय सोप्या भाषेत खेळीमेळीच्या वातावरणात विश्लेषण केले.

समाजात अग्रेसर राहून धर्मकार्य केल्याबद्दल कवी महादेव धुळध्वज, गौतम भोवते, चिंतामण मनवर, तुकाराम उबाळे, रमेश वहीले, यशवंत भरणे यांना धम्मभुषण गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदिप नगराळे संचलन एकनाथ मोगले व आभार श्याम काजळे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देविदास खंदारे,नंदू गुजर, उत्तम इंगोले, सदानंद उमरे, विवेक सरदार, दत्तात्रय मनवर, धनंजय मस्के, नितीन मनवर ,पुरुषोत्तम मेश्राम सुभाष मोहोड, लताताई भरणे, पुष्पाताई धुळध्वज, ज्योती वहीले इत्यादींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमास शेकडो समाजबांधव उपस्थित होते.शेवटी भोजनदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.