इंधन दरवाढ विरोधात युवासेनेचा एल्गार

32

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

नागभीड(दि.31ऑक्टोबर):-इंधन दरवाढीने देशातील सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल, डिझेलसह घरगुती गॅसचे दर गगनाला पोहोचल्याने गृहिणींचेही बजेट कोसळले आहे. पेट्रोल ११५ रूपये प्रति लिटर तर डिझेल शंभरीपार जाऊन पोहोचले आहे. या पार्श्वभूमीवर युवासेनेने राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे.

युवासेनेकडून दि. ३१ ऑक्टोबरला नागभीड शहरातील बाजार चौकातून सायकल रॅली काढण्यात आली. सदर रॅलीचे नेतृत्व नागभीड युवासेनेचे तालुका समन्वयक नाजीम शेख यांनी केले. प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रा. अमृत नखाते चिमूर विधानसभा क्षेत्र यांनी रॅलीला भगवी झेंडी दाखविली. यावेळी मनोज लडके उपतालुकाप्रमुख नागभीड, केवळराम पारधी उपतालुकाप्रमुख ब्रम्हपुरी, विक्की मडकाम माजी शहरप्रमुख नागभीड प्रामुख्याने उपस्थित होते.

सायकल रॅलीप्रसंगी युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी ‘हेच का ते अच्छे दिन?’ असे बॅनर झळकवत केंद्रातील मोदी सरकारला सवाल केला. तसेच ‘वा…रे मोदी तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल’ पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ विरोधात घोषणाबाजी करीत निदर्शने केली व सायकल रॅली काढून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला.

यावेळी सायकल रॅलीत युवा सेना तालुकाप्रमुख अजित गोडे, सुनिल बोरकर शहरप्रमुख, बाळू मेश्राम, सतिश बुरबांदे, गौरव खांदारे, रितीक राहुड, अर्मान पठाण, मोरेश्वर पाठक, महेश वालदे, जितेश सलामे, चंदन अमृतकर, पियुष कुर्झेकर, रवि पाठक, राहूल नान्हे, शिवा बोरसरे, रोशन पाठक, कार्तिक मदनकर, क्वचित बनकर, अमोल मांढरे, पारस अमृतकर, शुभम चिलबुले तसेच बहुसंख्य युवासैनिक उपस्थित होते._