✒️चोपडा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चोपडा(दि.31ऑक्टोबर):– येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभाग, मानसमित्र समुपदेशन केंद्र व आरोग्य केंद्र चोपडा नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शासन निर्देशानुसार मिशन युवा स्वास्थ्य मोहिमेंतर्गत कोविड – १९ प्रतिबंधक लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी यांच्या हस्ते कै. मा. ना. सौ. शरच्चंद्रिका सुरेश पाटील (माजी शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आले.

याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. के. एन. सोनवणे उपप्राचार्य प्रा. डॉ. व्ही. टी. पाटील, उपप्राचार्य प्रा. एन. एस. कोल्हे, श्री. बी. एस. हळपे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. शैलेश वाघ, प्रा. सौ. एम. टी. शिंदे, मानसमित्र समुपदेशन केंद्र समन्वयक डॉ. आर. आर. पाटील, रासेयो अधिकारी डॉ. पी. के. लभाणे उपस्थित होते. लसीकरण शिबिरासाठी आरोग्य कर्मचारी श्री. सचिन शिंदे, नदीम शेख, सुनीता पावरा, सविता ओली, आरती कापुरे उपस्थित होते. शिबिराचे प्रास्ताविक करतांना विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. शैलेश वाघ म्हणाले की, कोरोनापासून बचाव व्हावा व महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांचे आरोग्य व शारीरिक स्वास्थ उत्तमरीत्या टिकून रहावे या उद्देशाने या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

शासकीय निर्देशानुसार लसीकरण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश करण्याची परवानगी असल्याने विद्यार्थ्यांनी आपले दोन्ही डोस पूर्ण करण्यासाठी गांभीर्य पाळले पाहिजे. तसेच सामाजिक सुरक्षित अंतर व मास्कचा अनिवार्य वापर कटाक्षाने पाळले पाहिजेत तरच आपण कोरोनाला थोपवू शकतो.अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना उपप्राचार्य डॉ. के. एन. सोनवणे यांनी महाविद्यालयातील बऱ्याच विद्यार्थ्यांनी आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लस घेतली त्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांनी आपले आरोग्य चांगले राहावे, कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी स्वतःचे लसीकरण करून घेणे गरजेचे आहे व इतरांनीही लस घ्यायला हवी याउद्देशाने जनजागृती करणे आवश्यक आहे असे आवाहन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना सुदृढ आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.

प्राचार्य व मान्यवरांच्या हस्ते आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी या शिबीरात एकूण ६५ विद्यार्थ्यांनी लसीकरण करून घेतले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसमित्र समुपदेशन केंद्राचे समन्वयक डॉ. आर. आर. पाटील यांनी केले तर आभार सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डी. डी. कर्दपवार यांनी मानले.शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ. एम. एल. भुसारे, प्रा. वाय. एन. पाटील, डॉ. व्ही. आर. कांबळे, डॉ. प्रिती रावतोळे, सौ. क्रांती क्षिरसागर, सौ. सुनिता पाटील यासह राहुल निकुंभ, कविता बोरसे, ज्ञानेश्वर जोशी, पवन पाटील, प्रेरणा बडगुजर, अजय भिल, रविना पाटील, राजेश नाईक, किरण पाटील यांनी परिश्रम घेतले. यावेळी महाविद्यालयातील बहुसंख्य शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक , स्वास्थ 
©️ALL RIGHT RESERVED