✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगाव(दि.31ऑक्टोबर):– वकिली तसेच सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल Adv. प्रविणसिंह पुरभे यांना सरस्वती प्रतिष्ठान तथा सप्तरंगी मराठी चॅनल च्या वतीने मराठी कलाकार अभिजित खांडकेकर व मान्यवरांच्या हस्ते ‘सन्मान – २०२१’ सन्मान देऊन गौरविण्यात आले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जळगाव जिल्हा चॅरिटी लॉयर असोसिएशनचे अध्यक्ष Adv. प्रविणसिंह पुरभे यांना त्यांच्या वकिली क्षेत्रातील तसेच सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल ‘खान्देश सन्मान – २०२१’ पुरस्काराने गौरविण्यात आले. Adv. प्रविणसिंह पुरभे वीर रणसम्राट महाराणा प्रतापसिंह क्षत्रिय समाज संस्था जळगाव चे कायदेशीर मार्गदर्शक तसेच अखिल भारतीय क्षत्रिय महासभा जळगाव विभाग न्याय प्रकोष्ठ चे प्रमुख आहेत. त्याचप्रमाणे Adv. प्रविणसिंह पुरभे श्री. महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट निशाणे ता. धरणगाव, राजपूत पंच समाज धरणगाव, श्री कालभैरव देवस्थान सावखेडा आणि स्पंदन फाउंडेशन जळगाव चे कायदे मार्गदर्शक आहेत.

सामाजिक क्षेत्रातील विविध उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. सरस्वती प्रतिष्ठान तथा सप्तरंगी मराठी चॅनल यांच्या तर्फे आयोजित सन्मान कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. सुप्रसिद्ध मराठी कलाकार माझ्या नवऱ्याची बायको फेम अभिजित खांडकेकर यांच्या हस्ते Adv. प्रविणसिंह पुरभे यांना ‘खान्देश सन्मान – २०२१’ सन्मान प्रदान करण्यात आला. मान्यवरांच्या उपस्थितीत अतिशय सुंदर पद्धतीने हा सोहळा संपन्न झाला.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED