विनयपिटकात कुठंही काँग्रेसचा प्रचार करा म्हणून बुद्धाने भिक्षूंना सांगितलेलं नाही राजरत्न गायकवाड यांचे पय्याबोधी यांच्या उपस्थितीत त्यांच्यावर टीकास्त्र

26

✒️विशेष प्रतिनिधी(समाधान गायकवाड)

वसमत(दि.1नोव्हेंबर):-आज वसमत येथील गौतमनगर बौद्ध विहारात बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या सांगतेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी बोलताना राजरत्न गायकवाड यांनी भिक्षु म्हणवून घेणारे पय्याबोधी यांचा खरपूस समाचार घेतला त्रिपिटक हा जगातील सर्वात प्राचीन आणि पहिला मानवी कल्याणाच्या दृष्टीने लिखित स्वरूपातील धम्म ग्रंथ आहे.त्रिपिटकाचाच एक भाग असणारा विनयपीटक हा ग्रंथ बुद्धाच्या समकालीन असणाऱ्या न्हावी जातीच्या तत्कालीन प्रकांड पंडित असणाऱ्या उपाली या विद्वान भंतेने लिहिला आहे व त्यात भिक्षु व भिक्षुनी संघाची आचारसंहिता विशद केली आहे.

परंतु वर्तमान काळात जसे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित भंते बौद्ध धमाच्या तत्वज्ञानात भेसळ करण्यासाठी भिक्षु म्हणवून मिरवतात तसेच थोड्या थोडक्या लाभासाठी काँग्रेस प्रणित भंते हे समाजाची दिशाभूल करण्यासाठी काँग्रेसला मतदान करा म्हणून आवाहन करत बोंबलत असतात अश्या डुप्लिकेट भंते पासून समाजाने सावध राहील पाहिजे..

बाबासाहेबांचे लिखित स्वरूपातील सर्व साहित्य आज उपलब्ध आहे त्यांनी कधीही कुठंही काँग्रेसला सहकार्य करा अथवा मतदान करा या साठी मताधिकार बहाल केला नाही शत्रू पक्षाकडून आपल्या कल्याणाची अपेक्षा करता येणार नाही बाबासाहेबांचा लढा जसा विषमतावादी ब्राह्मणवादी व्यवस्थेच्या विरोधात होता तसाच या देशातील भांडवली शोषित वर्गाच्या विरोधात सुद्धा होता त्याच लोकांची वर्तमान कालीन पिलावळ आज आपल्याला धर्मनिरपेक्षतेचा बुरखा पांघरून आपला कैवार घेण्यासाठी येत आहेत यांना वेळीच यांची जागा दाखविण्याची गरज आहे.असे आवाहन केले.