रयत शेतकरी संघटनेच्या वतीने शिंदखेड ग्रामपंचायत कार्यालय येथे नेत्र तपासणी शिबीर संपन्न

47

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.1नोव्हेंबर):-रयत शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुनील भाऊ ठोसर यांच्या मार्गदर्शनाखाली व रयत शेतकरी संघटनेच्या संकल्पनेतून गेवराई तालुक्यातील मौजे शिंदखेड ग्रामपंचायत कार्यालय येथे मोफत नेत्र तपासणी, व औषधवाटप व मोफत शस्त्रक्रिया शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी तज्ज्ञ डॉक्टर विनोद पवार उपस्थित होते.

ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने रयत शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुनील भाऊ ठोसर यांच्या संकल्पनेतून हे शिबीर आयोजित करण्यात आले होते.

यामध्ये मौजे शिंदखेड व परिसरातील ग्रामीण भागातील शेतकरी,निराधार,दिव्यांग,कामगार,रोजगार आदी वृध्द यांची नेत्र तपासणी करण्यात आली यासह विविध आजारांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी करून त्यांना औषधवाटप करण्यात आले, तालुक्यात वैद्यकीय साधने उपलब्ध करून देण्यासाठी मी कायम पाठीशी आहे त्यामुळे कुठल्याही रुग्णांनी घाबरु नका असे सुनील ठोसर यांनी पत्रकार यांचेशी सांगितले विविध आजाराचे व वेगवेगळे शिबिर मी शिबिर मी कायम घेतो असे शिबिर राज्यात आपण घेणार आहे सर्वत्र गरजू जनतेने शिबिराचा लाभ घ्यावा ही विनंती करतो रयत शेतकरी संघटना प्रदेश सरचिटणीस सुनील भाऊ ठोसर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे