पेट्रोल-डिझेल शंभरी पार हेच का आछे दिन मोदी सरकार

34

✒️संदिप सोनवणे(विशेष प्रतिनिधी,येवला)मो:-९६०४१६२७४०

🔹युवासेने तर्फे उत्तर महाराष्ट्रात विस ठिकाणी बैलगाडी व सायकल मोर्चा काढत इंधन दर वाढीचा निषेध केला

येवला(दि.1नोव्हेंबर):- पेट्रोल-डिझेल शंभरी पार ये क्या हो गया मोदी सरकार हेच का आछे दिन असा सवाल करत केंद्र सरकारने केलेल्या प्रचंड दरवाढीचा विरोधात येवल्यात युवासेना तर्फे बैलगाडी मोर्चा काढत आंबेडकर चौफुली येथे नगर – मनमाड व नाशिक – औरंगाबाद महामार्ग काही काळ बंद करण्यात आला. उत्तर महाराष्ट्रात विस ठिकाणी आंदोलने झाल्याने शिव सेनेची यांदाची दिवाळी सायकलवर झाली.दिवसेंदिवस केंद्र सरकारने पेट्रोल – डिझेल व गॅस दरवाढ करीत आसल्याने सामान्य जनता मेटाकुटिस आली आहे. याचा निषेधार्थ येवला, नांदगाव, मालेगाव, देवळा, नाशिक यां सह उत्तर महाराष्ट्रात विस ठिकाणी आंदोलन झाले.

जनतेचा संतप व्यक्त होवा व शासनाला या दरवाढीची तीव्रता कळवी या साठी युवासेना तर्फे आमदार नरेंद्र दराडे व माजी माजी सभापाती संभाजीराजे पावर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.रविवारी सकाळी विंचूर चौफुली येथे बैलगाडीची रॅली काढून युवासेना व शिवसेनेने आंदोलन केले. आमदार दराडे, पवार यांच्यासह युवकांनी बैलगाडीत बसून इंधन दरवाढीविरोधात घोषणाबाजी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आला. या वेळी ‘हेच का अच्छे दिन’, ‘पेट्रोल-डिझेल शंभरी पार, ये क्या हो गया मोदी सरकार’ अशा घोषणा देत तसेच फलक हातात धरून लक्ष वेधण्यात आले.

पेट्रोल-डिझेलच्या होणाऱ्या प्रचंड दरवाढीमुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. सामान्य जनता होरपळून निघत असताना, अन्यायकारक दरवाढ कमी करण्याऐवजी रोज दरात वाढ होत आहे. शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे जगणे यामुळे मुश्कील झाले असून, केंद्र सरकारने आतातरी झोपेतून बाहेर यावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली. रोजची दरवाढ अन्यायकारक असून, जुलमी आहे. सामान्य जनतेला ‘जगावं की मरावं’ हा प्रश्न पडला आहे, ही जुलमी दरवाढ त्वरित थांबून पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यात यावेत, या मागणीचे निवेदन नायब तहसीलदारांना देण्यात आले.

येवला येथील आंदोलनात तालुकाप्रमुख रतन बोरणारे, शहरप्रमुख राजेंद्र लोणारी, उपजिल्हाप्रमुख भास्कर कोंढरे, युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख ॲड. बापूसाहेब गायकवाड, युवासेना तालुकाप्रमुख अरुण शेलार, शहरप्रमुख लक्ष्मण गवळी, सभापती प्रवीण गायकवाड, सारी अन्सारी, शेखर शिंदे, दिनेश पागिरे, विकास गायकवाड आदी सहभागी झाले.