गोवा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये क्रांतीगर्भ शॉर्टफिल्मचे ऑफिशियल सिलेक्शन

26

✒️गोवा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

गोवा(दि.1नोव्हेंबर):-सन २०२१ च्या गोवा इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल मध्ये नागपूर नगरीत बनलेल्या क्रांतीगर्भ शॉर्ट फिल्मचे ऑफिशियल सिलेक्शन झाले आहे. ही फिल्म किसान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली आहे. या फिल्ममध्ये दोन विचारांच्या संघर्षाची कहाणी प्रस्तुत केलेली आहे. भारतीय लोकांमध्ये समता ,बंधुभाव ,व न्यायाची पेरणी करणारी आहे .किसान आंदोलनांतून नवे क्रांतीगर्भ निर्माण करणारी ही फिल्म जनतेला नव्या परिवर्तनवादी विचारांची मशाल प्रज्वलित करण्याचा संदेश देणारी आहे.संविधानात्मक विचारक्रांतीतून भारत अखंड ठेवण्याचा संदेश देणारी आहे.या शॉर्ट फिल्मचे निर्माते /लेखक/ गीतकार संदीप गायकवाड आहेत तर नागेश वाहुरवाघ यांच्या निर्देशनातून ही कलात्मक बनलेली आहे.

या शॉर्ट फिल्मचे कलाकार अश्विन नाईक, देवेंद्र पाल सिंग सिद्धू ,विकाल जिल्हेकर, सम्राट उंदीरवाडे, चक्षूपाल जामनिक ,अरमान खान , निहाल उमरे हे मुख्य भूमिकेत आहेत.या शॉर्ट फिल्मचे म्युझिक परितोष हजारे यांनी दिले आहे. या फिल्मचे एडिटिंग सुबोध आनंद यांनी केले आहे , या फिल्मचे डबिंग कार्य मिलिंद कुलकर्णी यांनी केले.

या फिल्मचे कॅमेरामॅन अभिलाष विश्वकर्मा , असिस्टंट कॅमेरामॅन मंगेश रामटेके व नितिन मरस्कोल्हे हे आहेत .कास्ट डायरेक्टर सुमेध मुजमुले हे आहेत.या मधील गीत गायक साहिल गुर्वे अकोला यांनी गायले आहे. मेकअप आर्टिस्ट आरती नगराळे ह्या आहेत.प्रोडक्शनला प्रितेश मेश्राम, अमीत दुर्योधन ,अतिरेक मेश्राम यांनी सहकार्य केले.गट ग्रामपंचायत हुडकेश्वर खुर्द येथील पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी मोठे सहकार्य केले आहे. ही फिल्म भारतीय एकात्मतेचा संदेश देणारे असून समग्र भारतीय शेतकऱ्यांना एक होण्याचे आवाहन करणारी आहे.