कुंटूर येथे द्वितीय मेंढपाळ हक्क परिषद उत्साहात संपन्न..

24

✒️चांदू आंबटवाड(नायगाव प्रतिनिधी)मो:-9307896949

नायगाव(दि.1नोव्हेंबर):- तालुक्यातील मौजे कुंटूर येथील खंडोबा मंदिरात मेंढपाळ आर्मी व युवा मल्हार सेनेच्या संयुक्त विद्यमाने मेंढपाळ परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला अध्यक्षस्थानी लाभलेले रूपेश भैय्या देशमुख यांनी लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले व प्रमुख मार्गदर्शन मा.अर्जुन थोरात, वैजनाथ पावडे यांनी आपल्या खुमासदार भाषनातून मेंढपाळांची मने जिंकली, मेंढपाळांचे जिवनमान उंचावण्यासाठी राज्य व केन्द्र सरकारने कोनत्या उपाययोजना करायला पाहिजे यावर परिषदेत विचार करण्यात आला. परिषदेला प्रमुख पाहूणे म्हणून लक्ष्मणराव देवदे,सिताराम देवदे,सुर्याजी पा. चाडकर,सुर्यकांत पा.कदम,शिवाजी पा. होळकर बालाजी मद्देवाड बरबडा यांनी मेंढपाळांना शिका, संघटीत व्हा आणि हक्क मिळवण्यासाठी संघर्ष सुद्धा करण्याचा सल्ला दिला.

मेंढपाळ आर्मी चे कार्य 1980 पासुन चालू असुन युवकांनी पुढे याव आणि समाजातील मेंढपाळांची सेवा करावी, आणि समाज बांधवांनी व्यसन मुक्त रहावे,असे स्पष्ट केलेपरिषदेचे सुत्रसंचलन खंडेराव वड्डे गुरुजी यांनी केले तर आभार प्रदर्शन चंद्रकांत महादाळे यांनी मांडले. पत्रकार चांदू आंबटवाड व बालाजी हनमंते यांच्या सह कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश बिस्मील्ले, अशोक महादाळे, रामा शिगळे,मोहनराव महादाळे, प्रभाकर कमळे,शेषराव गुंठे,उत्तम देवदे,शंकर यगलुरे,कोंडीबा शेट्टे, दत्ता सुरणे,नागण गुंठे, मारोतराव शेट्टे यांनी परिश्रम घेतले व या कार्यक्रमात महिलांची उपस्थिती विषेश होती..