✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.1नोव्हेंबर):-दर्जाहिन कामे,त्यातच यंदा झालेला मान्सून आणि परतीच्या पावसाचा दणका यामुळे आष्टीहून नगरला जाणा-या प्रमुख रहदारीचा असलेला आष्टी-साबलखेड १७ किमी रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली होती.भले मोठे खड्डे व छोट्या मोठ्या खड्ड्यांच्या मालिकांनी वाहनचालक अक्षरशः मेटाकुटीस आला होते यावर माध्यमांनी आवाज उठवताच सामाजिक कार्यकर्ते अनिल तात्या ढोबळे व राम बोडखे यांच्या नेतृत्वाखाली दोन वेळा रस्ता रोको आंदोलन झाले होते.याचेच फलित म्हणून अखेर सोमवारपासून खड्डे बुजविण्यास सुरुवात केली आहे.दरम्यानच्या काळात आमदार बाळासाहेब आजबे व शंकर देशमुख यांनीही केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे जाऊन भेट घेऊन सदरील रस्त्याचा प्रश्न मांडला होता.

गेल्या दिड वर्षापासून आष्टी – अहमदनगर हा रस्ता अत्यंत खराब झाला होता.परंतु हा रस्ता राज्य महामार्गातून केंद्रीय महामार्गाकडे हास्तांतरीत केल्याने यावर केंद्रातून बजेट आले पण सतरा कि.मी.रस्ताच नादूरूस्तीचा ठेवला याचे कारणही असे आहे की,अहमद नगर ते जामखेड हा ७७ कि.मी.च्या रस्त्यापैकी ५१ कि.मी.रस्त्यासाठी ३५ कोटी मंजूर झाले होते.त्यातील साबलखेड ते आष्टी हा रस्ता माञ,नादूरूस्तीचा तसाच ठेवला होता.यावर कड्यामध्ये दोन वेळा रस्ता रोको आंदोलन करण्यात आले तसेच नागपूर येथेही आ.बाळासाहेब आजबे व शंकर देशमुख यांनी गडकरी यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावला आहे.आता या रस्त्यावरील खड्डे बुजवले मात्र या १७ किलोमीटरवरील रस्त्याचे अस्तरीकरण कधी होणार हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED