क्रिसेंटा प्रोडक्शनतर्फे शोनी विर्दी दिग्दर्शित मेट्रो मे रेट्रो म्युझिक अल्बम लवकरच होणार प्रदर्शित

29

✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पुणे(दि.1नोव्हेंबर): -क्रिसेंटा प्रोडक्शनतर्फे आता नवीन म्युझिक अल्बम घेवून येत आहे मेट्रो मे रेट्रो या म्युझिक अल्बमचे निर्मिती, दिग्दर्शन व कास्टिंग शोनी विर्दी यांनी केले आहे.या गीतामध्ये 1970 व 1980 मधील फॅशनचा समावेश केला असून तसेच या काळामध्ये वापरल्या गेलेल्या जुन्या मोटर बाईक या मुझिक अल्बम मध्ये दाखविल्या जाणार आहे .जुन्या काळातील सुंदर आठवणींना उजाळा या मूझिक अल्बम द्वारे केला जाणार आहे. या म्युझिक अल्बमचे गायन सौरभ राईजदा यांनी केले आहे.या म्युझिक अल्बम चे गीतलेखन यु.जे.यांनी केले आहे. म्युझिक अल्बमची सिनेमॅटोग्राफी क्षितिज घाडगे यांनी केली आहे.

या म्युझिक अल्बम चे संकलन सुमित यंदे यांनी केले आहे. या म्युझिक अल्बममध्ये प्रीती नायडू, गिनील नवलकर ,संस्कार वाडेकर, रेणू अग्रवाल, अक्षय दुलांगे, विजय शर्मा, जास्मिन शेख, पवन नायक, झैनाब सईद,मंजू सावंत, प्रेसिदा वंजारे, टिंटू चव्हाण यांनी अभिनय केला आहे. तसेच बाल कलाकारांमध्ये आरव, सिया विकास गिरी , दक्श जीनवल , अदविका ठोकळे,रूषिष सईद यांनी अभिनय केला आहे.या म्युझिक अल्बमचे डी .आय . डिजी सिक्स सेन्स स्टुडिओ यांनी केले आहे. या म्युझिक अल्बमचे मेकअप संगीता पाटील व नाझिया दिवाण यांनी केले आहे.

या म्युझिक अल्बमची केशभूषा मन्सूर शेख व हिना ओसवाल यांनी केली आहे.या म्युझिक अल्बमची फोटोग्राफी आकाश घाडगे यांनी केली आहे.या म्युझिक अल्बम साठी लाईट इफेक्टस ज्ञानेश्वर दहिवाल यांनी दिले आहेत. म्युझिक अल्बम साठी व्हेन्यू पार्टनर म्हणून ब्ल्यू नाईल रेस्टॉरंटचे मोस्तफा व सईद हे होते .या म्युझिक अल्बम चे हा म्युझिक अल्बम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या म्युझिक अल्बम चे चित्रीकरण पुण्यातील कॅम्प येथे हॉटेल ब्ल्यू नाईल रेस्टॉरंट व पुणे परिसरात उत्साहात पार पडले.